Pune metro expansion towards airport Sarkarnama
पुणे

Pune Metro : पुण्याच्या पायाभूत विकासाला मोठा वेग; विमानतळासाठी मेट्रो तर 'या' मार्गावर होणार भव्य दुहेरी उड्डाणपूल

Pune metro expansion towards airport : पुण्यातील पायाभूत विकासाला मोठा वेग मिळणार असून विमानतळासाठी मेट्रो आणि भव्य दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन शहरातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.

Rashmi Mane

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोने जोडणारा कल्याणीनगर ते पुणे विमानतळ हा नवा मेट्रो मार्ग अंतिम करण्यात आला आहे. तसेच वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाचा सुधारित आराखडा लवकरच तयार करण्याची सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास दिल्या आहेत.

पुणे मेट्रो आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांवर मेट्रो भवन येथे झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, संचालक विनोदकुमार अग्रवाल, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल

पौड फाट्यापासून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो मार्गावर पौड फाट्यापासून तर थेट वनदेवी मंदिरापर्यंत दुहेरी उड्डाणपूलाचे नियोजन करण्याबाबत मंत्री मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास सूचित केले असून याबाबत पुढील कार्यवाही लवकरच सुरु होत आहे. पूर्वी या मार्गावर पौड फाटा ते कर्वे पुतळादरम्यान केवळ वाहनांसाठी उड्डाणपूलाचे नियोजन होते. आता थेट वनदेवीपर्यंत मेट्रोसहित दुहेरी उड्डाणपूल होणार आहे. या दुहेरी उड्डाणपूलामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांसह डेक्कनहून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय पाच सिग्नलचे चौक वाहतूक कोंडीमुक्त होणार आहेत.

चांदणी चौक- वाकड दरम्यान मेट्रो

शेवाळेवाडी-हडपसर-कात्रज हा नियोजित मार्ग चांदणी चौक-वाकडपर्यंत वाढविण्यात यावा, अशा सूचना मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास दिल्या असून या मार्गासाठीचा डिपीआर करण्याचेही आदेशही त्यांनी मेट्रो प्रशासनास दिले आहे. या मार्गामुळे शहराभोवती मेट्रोचे जाळे निर्माण होण्यास मदत होणार असून मार्गावरील उपनगरातील नागरिकांना मेट्रोची कनेक्टिव्हीटी उपलब्ध होणार आहे.

‘‘पुणे शहराच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी. ’’

- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT