Mahua Moitra : मोठी बातमी! महुआ मोईत्रा यांच्यावर रेस्टॉरंटमध्ये अंडीफेक, बैठकीदरम्यान झाला जोरदार राडा; दोन तासांपासून हॉटेलमध्ये अडकल्या...

Mahua Moitra controversy today : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर आंदोलनादरम्यान अंडीफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर त्यांना जवळपास दोन तास हॉटेलमध्ये थांबावे लागले. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
Eggs thrown at Mahua Moitra
Eggs thrown at Mahua MoitraSarkarnama
Published on
Updated on

पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. विरोधकांवर जोरदार टीका करणाऱ्या आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर अंडीफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राज्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याची चर्चा सुरू झाली असून, या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

बुधवारी महुआ मोईत्रा या कोलकात्यातील एका हॉटेलमधील रेस्टॉरंटमध्ये पक्षाच्या काही कार्यकर्त्यांसोबत बैठकीसाठी उपस्थित होत्या. त्याचवेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अंडीफेक केल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने महुआ मोईत्रा आणि त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते जवळपास दोन तास हॉटेलमध्येच थांबून राहिल्याची माहिती समोर आली आहे.

Eggs thrown at Mahua Moitra
Donald trump birthright citizenship : 'अमेरिकेत जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकनच!' सुप्रीम कोर्टाचा ट्रम्प यांना मोठा झटका; लाखो भारतीयांना दिलासा

या प्रकरणाची माहिती स्वतः महुआ मोईत्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली. त्यांनी या हल्ल्यामागे भाजप समर्थक असल्याचा आरोप करत संबंधितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. तसेच पश्चिम बंगाल पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर अंडी किंवा टोमॅटो फेकण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी तसेच कल्याण बॅनर्जी यांनाही अशाच प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अशा घटनांबाबत राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

Eggs thrown at Mahua Moitra
Jalinder Kamte death news : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामटे यांचे निधन

राज्यात वाढत्या अशा घटनांची दखल घेत कोलकात्ता उच्च न्यायालयानेही यापूर्वी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली आहे. अंडीफेक किंवा तत्सम हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com