Kasaba By Election latest news : sarkarnama
पुणे

BJP News : निमंत्रण पत्रिकेतून काकडेंचे नाव,फोटो गायब ? ; निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील धुसफूस आली समोर

Kasaba By Election latest news : निमंत्रण पत्रिकेची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा आहे.

सरकारनामा ब्युरो

Kasaba By Election latest news : पुण्यातील कसबापेठ मतदारसंघाच्या (Kasaba By Election) पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. रासनेंचा अर्ज भरण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी कसबा पेठ गणपतीसमोर शक्तीप्रदर्शन केलं. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शहर भाजपकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांचे नाव आजच्या निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आले आहे. या निमंत्रण पत्रिकेवरुन भाजपअंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.या निमंत्रण पत्रिकेची समाज माध्यमांवर जोरदार चर्चा आहे. ही पत्रिका व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा होत आहे.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावरही संजय काकडे यांचा फोटो नाही. अर्ज भरण्यासाठी शहर भाजपकडून जो मेसेज व्हॉट्सॲप वर पाठवला आहे, त्यातही संजय काकडे यांचा उल्लेख नाही.

भाजपला फटका बसणार ?

भाजपकडून काकडेंना का डावलण्यात आले, याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय काकडेंच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली आहे.भाजप उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी काकडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. काकडेंना डावलले तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

अनुपस्थितीची चर्चा

कसबा पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या झालेल्या दोन-तीन बैठकांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत काकडे उपस्थित होते. "ज्याचे काम चांगले आहे, त्यांनाच संधी देण्यात येईल," असे यावेळी काकडे म्हणाले होते. रासने यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय काकडेंच्या अनुपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

काकडे यांना मानणारा मोठा मतदार

कसबा पेठ विधानसभा मतदार संघात माजी खासदार संजय काकडे यांना मानणारा मोठा मतदार आहे. काकडे यांचा जन्म घोरपडी पेठेतला असून वयाच्या 22 वर्षांपर्यंत काकडे यांचे घोरपडी पेठेत वास्तव्य होते. त्यामुळे घोरपडी पेठेबरोबरच 7 व 9 नंबर कॉलनी, गंज पेठ, शुक्रवार पेठ, कसबा पेठ, रविवार पेठ यामध्ये काकडेंना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत.

याशिवाय कसबा पेठेतील मुस्लिम व दलित समाज देखील काकडेंना मोठ्या प्रमाणात मानतो. रासनेंच्या निमंत्रण पत्रिकेत काकडेंचा फोटो नसल्याने त्याचा काय परिणाम होतो, हे निकालावरुन स्पष्ट होईल. तर खासदार गिरीश बापट हे आजारी असल्याने ते या निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT