Crime News  Sarkarnama
पुणे

Pune Gun Fire: कोथरुडमध्ये गुंडांचा हैदोस! तीन गोळ्यांनी जखमी झालेल्या प्रकाश धुमाळ यांनी सांगितली आपबिती

Pune Gun Fire: रक्तानं माखलेले पाय आणि सैरावरा धाव घेत धुमाळ यांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.

Amit Ujagare

Pune Gun Fire: पुणे शहरातील कोथरूड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गुंडांनी हैदोस घातला. निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ यांना तीन गोळ्या लागल्यानं ते गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ही घटना पोलीस चौकीपासून केवळ २०० मीटर अंतरावर घडली. तरी देखील पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास अर्धा तास लागला. पंधरादिवसांपूर्वीच पुण्यातील नाना पेठेत आंदेकर टोळीनं गँगवॉरमध्ये दिवसाढवळ्या गोळ्या घालून एका तरुणाची हत्या केली होती. या घटनेमुळं पुणे पोलिसांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

कालच्या घटनेत जखमी झालेल्या प्रकाश धुमाळ यांनी सांगितलं की, आम्ही मित्रमंडळी पुणे जिल्ह्यातील शिवापूर भागात पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टी संपल्यानंतर मध्यरात्री आम्ही कोथरूड परिसरात परतलो. यावेळी मी माझ्या मित्राला घरी सोडण्यासाठी कारनं कोथरूडमध्ये गेलो. त्याचवेळी चांदणी चौकातून दोन आरोपी दुचाकीवरुन येत होते. यावेळी हे दोघे गुंड आमच्या मागून आले आणि आम्ही या भागातले भाई आहोत, अशा शब्दांत आम्हाला धमकी दिली. यावेळी मी त्यांना पुढे जाण्यासाठी साईड न दिल्यानं या संतापलेल्या गुंडांनी बंदूक काढून अंदाधुंद फायरिंग सुरू केली. यामध्ये माझ्या पायावर तीन गोळ्या लागल्या.

अचानक घडलेल्या या घटनेमुळं धुमाळ हे आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत होते. त्यामुळं रक्तानं माखलेल्या पायांच्या ठशांचा मार्ग या परिसरात दिसून येतो, जो घटनेच्या भयावहतेची साक्ष देतो. गोळ्या लागल्यानंतर धुमाळ हे एका जवळच्या इमारतीच्या दिशेने धावत गेले आणि पाण्याच्या टाकीवर लपून बसले. यावेळी स्थानिक रहिवासी सचिन गोपाळघरे यांनी धुमाळ यांना पाणी देऊन आधार दिला. गोपाळघरे यांच्या या मदतीनं धुमाळ यांना तात्काळ सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

या गोळीबाराचे मुख्य आरोपी निलेश घायवळ टोळीतील सदस्य मयुर कुंभारे असल्याचे समोर आलं आहे. कुंभारेने हा थरार घडवून आणला असून, पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. मात्र, त्याचे बाकी साथीदार अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जखमी झालेले धुमाळ आणि हल्लेखोर यांचा पूर्व परिचय नव्हता फक्त दहशत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा हल्ला करण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT