Pune : शांत, सुसंस्कृत अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली असल्याचे समोर आले आहे. शहराचा पूर्व भाग असलेल्या वडगावशेरी, येरवडा भागात रहिवाशांमध्ये दहशत माजविण्यासाठी टोळक्याने 30 ते 35 वाहनांची तोडफोड केली. याला विरोध करण्यासाठी आलेल्या रहिवाशांना टोळक्याने शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. या गुंड प्रवृत्तीचा कायमचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.
पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून वर्चस्व निर्माण करण्यासाठी विनाकारण दहशत माजविण्याचे प्रकार सुरू आहेत. गुंड प्रवृत्तीचे तरूण एकत्र येऊन रहिवाशांच्या वाहनांची तोडफोड करत आहेत. पुण्यात येरवडा भागातील लक्ष्मीनगर परिसरात सोमवारी मध्यरात्री टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकारांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. येरवडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वडगावशेरी भागात भांडणे मिटविण्यासाठी गेलेल्या तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन सराईतांसह चौघांना अटक करण्यात आली आहे. अमोल वसंत चोरघडे (वय 30) ह्रषिकेश टूणटूण चव्हाण (वय 18), अनुज जितेंद्र यादव, आकाश भरत पवार (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वडगावशेरी येथील सौरभ संतोष पाडळे (वय 22) यांनी ही तक्रार दिली आहे.
तक्रारदार सौरभ पाडळे याचा मित्र ऋषिकेश ढोरे याचे आकाशशी भांडण झाले होते. वाद मिटवण्यासाठी सौरभ मित्रांसह वडगाव शेरी या भागात आला होता. त्यावेळी आकाशने सौरभला मारहाण केली. अनुजने ऋषिकेशवर कोयत्याने वार केले. सौरभचा मित्र अभी आगरकर आणि योगेश ऋषिकेशला वाचवण्यासाठी गेले. तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. आरोपींनी कोयते उगारून परिसरात दहशत माजविली, अशी माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक निलेश घोरपडे तपास करत आहेत.
(Edited By - Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.