Chetan Tupe News : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 'तटस्थ' राहिलेल्या तुपे पाटलांचे अखेर ठरले!

Guardian Minister Ajit Pawar inspected Hadapsar constituency : पालकमंत्री अजित पवार यांनी केली हडपसर विधानसभा मतदारसंघात पाहणी
Ajit Pawar, Chetan Tupe
Ajit Pawar, Chetan TupeSarkarnama
Published on
Updated on

Hadapsar News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर गेले अनेक महिने तटस्थ भूमिका घेणारे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे अजितदादा पवार यांच्याच गटात असल्याचे मंगळवारी सिद्ध झाले. हडपसर मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करून प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे हडपसरमध्ये आले होते. त्यावेळी आमदार तुपे त्यांच्या बरोबर दिसून आले. यापूर्वी तटस्थ भूमिका घेणारे आमदार तुपे यांनी अजितदादांबरोबर जाणे पसंद केल्याने पुणे शहरातील दोन्ही आमदार आता अजितदादांबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार पक्षातील वरिष्ठ नेत्यांना घेऊन बाहेर पडले. त्यांनी राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे अजित पवार यांच्या गटाकडून सांगण्यात येत होते. शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी पहिल्यापासूनच आपण अजित पवारांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी स्पष्ट भूमिका घेतली नसल्याने चर्चांना उधाण आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Chetan Tupe
Pune Loksabha : पुणे लोकसभा लढवणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. त्यावेळी आमदार तुपे यांनी या बैठकीला हजेरी लावून आपण शरद पवारांसोबत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर थोड्या दिवसांमध्येच तुपे अजित पवार यांच्याबरोबर एका व्यासपीठावर दिसून आले होते. नागपूर हिवाळी अधिवेशानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेसाठी तालिका अध्यक्ष म्हणून आमदार चेतन तुपे यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे तुपे हे अजितदादा गटाबरोबरच असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र तुपे यावर बोलत नव्हते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी हडपसर मतदारसंघात जाऊन तेथील प्रश्न समजावून घेत आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिल्या. हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार चेतन तुपे यांनी या मतदारसंघातील काही प्रश्न, अडचणी मांडून एकदा प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती. यानुसार हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मांजरी भागातील पाणीपुरवठा योजना, रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, यासह अन्य प्रलंबित कामांची पाहणी करून त्याबाबतच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे अजित पवारांनी सांगितले.

Edited by Deepak Kulkarni

Ajit Pawar, Chetan Tupe
Ajit Pawar News : अजित पवार पुढच्या तीन महिन्यांत जेलमध्ये असतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com