Bapusaheb Pathare sarkarnama
पुणे

Bapusahab Pathare : नवीन आमदार करण्याचा ट्रेंड 'या' मतदारसंघात कायम; पुण्यात तुतारी वाजली!

Vadgaon Sheri Vidhan Sabha Election 2024 bapusahab pathares won : वडगाव शेरी मतदार संघातून बापूसाहेब पठारे ५ हजार मताधिक्याने विजयी झाले. चौदाव्या फेरीपासून बापू पठारे यांनी आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत टिकवून ठेवत पठारे यांनी विजय मिळवला आहे.

Mangesh Mahale

Vadgaon Sheri Vidhan Sabha Election 2024 bapusahab pathares won : वडगाव शेरी मतदार संघातून बापूसाहेब पठारे ५ हजार मताधिक्याने विजयी झाले. चौदाव्या फेरीपासून बापू पठारे यांनी आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत टिकवून ठेवत पठारे यांनी विजय मिळवला आहे.

वडगाव शेरी मधून महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बापू पठारे यांचा विजय झाला आहे. दरवेळी नवीन आमदाराची परंपरा पुण्यातील वडगाव शेरीमध्ये कायम राहिली. बापू पठारे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरेंचा पराभव करत पुण्यात महाविकास आघाडीला एक जागा मिळवून दिली आहे.

वडगाव शेरीमध्ये प्रत्येक निवडणुकीत नवीन आमदार करण्याचा ट्रेंड कायम राहिला. २००९ मध्ये बापू पठारे हे विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये वडगाव शेरी मधील नागरिकांनी मोदी लाटेत भाजपच्या जगदीश मुळीक यांना विजयी केलं. २०१९ मध्ये त्यांना पुन्हा एकदा निवडून न देता, अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली. यंदा पुन्हा तोच आमदार नको म्हणत, वडगाव शेरी वासियांनी तुतारी हाती घेतलेल्या बापू पठारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

वडगाव शेरी मतदार संघातून बापूसाहेब पठारे ५ हजार मताधिक्याने विजयी झाले. चौदाव्या फेरीपासून बापू पठारे यांनी आघाडी घेतली होती. ती अखेरपर्यंत टिकवून ठेवत पठारे यांनी विजय मिळवला आहे. वडगाव शेरीमध्ये उमदेवारी कुणाला द्यावी, यावरुन महायुतीत अनेक दिवस खल सुरु होता. महायुतीकडून माजी आमदार जगदीश मुळीक हे इच्छुक होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विद्यमान आमदार असलेल्या सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आली. जगदीश मुळीक यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

पुण्यातील पोर्शे अपघातात टिंगरे यांना गोवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.या प्रकणामुळे टिंगरे हे वादात सापडले होते. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बापू पठारे यांनी भाजपमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आजी-माजी आमदारांमध्ये लढत झाली. यात पठारे यांनी बाजी मारली. पठारे यांचे चिंरजीव सुरेंद्र पठारे यांनी आखलेली रणनीतीमुळे पठारे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्यामुळे या विजयाचे श्रेय पठारेंनी आपल्या चिरंजीवाला दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT