Pachora Assembly Election 2024 Final Result : खान्देशात सख्या बहिणीचा पराभव; तात्यासाहेबांचा वारसदार ठरला! भावानं दुसऱ्यांदा बाजी मारली!

Pachora Assembly Constituency Kishore Patil Won : किशोर पाटील यांना 97 हजार 366 मते मिळाली, तर वैशाली सूर्यवंशी यांना 58 हजार 677 मते मिळाली आहेत. किशोर पाटलांनी 38 हजार 689 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांचा विजय निश्चित असल्याचे सध्याचे चित्र आहे.
Pachora  Assembly Election 2024 Final result
Pachora Assembly Election 2024 Final result Sarkarnama
Published on
Updated on

पाचोरा विधानसभा मतदारसंघात बहीण विरुद्ध भाऊ अशी ऐतिहासिक लढत जळगाव जिल्ह्याच्या राजकीय इतिहासांत पहिल्यांदाच झाली. शिंदेसेनेकडून विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध उद्धवसेनेकडून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

शेवटच्या फेरीअखेर किशोर पाटील यांना 97 हजार 366 मते मिळाली, तर वैशाली सूर्यवंशी यांना 58 हजार 677 मते मिळाली आहेत. किशोर पाटलांनी 38 हजार 689 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांचा विजय निश्चित असल्याचे सध्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

या मतदारसंघात भाजपचे तालुकाप्रमुख अमोल शिंदे व माजी आमदार दिलीप वाघ यांनीही अपक्ष उमेदवारी केल्यामुळे काट्याची लढत झाली.विद्यमान आमदार किशोर पाटील यांना त्यांच्या बहिणीने आव्हान दिले होते यामुळे भाऊ-बहिणीची ही लढत लक्षणीय ठरली.'लाडक्या बहिणीमुळे' महायुतीला राज्यात यश मिळाले, मात्र पाचोरा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांचा पराभव झाला आहे.

Pachora  Assembly Election 2024 Final result
Chalisgaon Assembly Election 2024 final result live: जुन्या मित्रानेच धूळ चारली; चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाणांनी मैदान मारले

या लढतीमुळे पाचोऱ्याचे माजी आमदार दिवंगत आर.ओ. पाटील (तात्यासाहेब) यांचे वारस मुख्य शिलेदार ठरणार आहे. किशोर पाटील हे शिवसेनेकडून आमदार झाले होते. शिवसेनेत फुट पडल्यानंतर किशोर पाटील यांनी ठाकरें ऐवजी शिंदेंना साथ दिली. शिंदेंनी त्यांना पुन्हा एकदा पाचोरा विधानसभा मतदार संघातून संधी दिली होती. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने त्यांची बहीण वैशाली सुर्यवंशी यांना मैदानात उतरवले होते.

Pachora  Assembly Election 2024 Final result
Amalner assembly election 2024: अनिल पाटलांनी गुलाल उधळला; शिरीष चौधरी यांना दुसऱ्यांदा अस्मान दाखवलं

राज्याच्या शेवटच्या सीमा भागात असलेला जळगाव जिल्हा हा अकरा विधानसभा मतदासंघाचे क्षेत्र आहे. या अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये रावेर, जळगाव, जळगाव ग्रामीण, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव हे सर्वाधिक लक्षवेधी विधानसभा क्षेत्र आहे.

भाजपाचे बंडखोर अमोल शिंदे यांनी पुन्हा रिंगणात उडी घेतलेली होती. गेल्या वेळेस त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता.पाचोरा भडगाव या मतदारसंघावर तात्या पाटील (तात्यासाहेब रघुनाथ ओंकार पाटील आर.ओ. पाटील) यांचे वारसदार किशोर पाटील व त्यांची मुलगी वैशाली सूर्यवंशी हे विजयी होणार का ? यांच्या भांडणांमध्ये अमोल शिंदे बाजी मारणार याची चर्चा सुरु होती. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com