Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Dhangekar On Pune Loksabha By-Election : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत आमदार रवींद्र धंगेकर यांचे मोठे विधान....

भाजप खासदार गिरीश बापट यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे.

भारत नागणे

पंढरपूर : पुणे (Pune) लोकसभा (Lok sabha) मतदारसंघाची पोटनिवडणूक (By Election) आपण लढवणार नाही, अशी घोषणा कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी पंढरपुरात बोलताना केली. (Pune Lok Sabha by-election i will not contest : MLA Ravindra Dhangekar)

आमदार रवींद्र धंगेकर हे आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. लोणारी समाजाच्या वतीने आमदार धगेंकर यांच्यावर पुष्पवृष्टी करून जल्लोषात स्वागत केले. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकार विषयी मोठी भविष्यवाणी वर्तवली आहे. तसेच, पुणे लोकसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे.

भाजप खासदार गिरीश बापट यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे पोस्टर भावी खासदार म्हणून झकळले होते. त्यावर टीका झाल्यानंतर भाजप आणि मुळीक यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले हेाते.

दरम्यान, काँग्रेसकडून निवडणुकीसंदर्भात विधान आल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधितांना खडे बोल सुनावले होते. मात्र, आज पुन्हा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा बॅनर भावी खासदार म्हणून पुणे शहरात झळकला आहे. काँग्रेसच्या गोटातून कसब्यात भाजपला अस्मान दाखविणारे रवींद्र धंगेकर यांचे नावही चर्चेत होते. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आमदार धंगेकर म्हणाले की, भाजपने निवडणूकीपूर्वी सर्वसामान्य लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही. त्यामुळे भाजप आणि मोदी सरकार विरोधात देशात आणि राज्यात मोठी लाट तयार झाली आहे. जनता मोदी सरकारला त्यांच्या मूळ ठिकाणावर नेवून ठेवेल.

गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि व्यापारी यांचे एकही काम केले नाही. उलट महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात देशात मोठी लाट तयार झाली आहे. येत्या निवडणुकीत जनता भाजपला त्यांची जागा दाखवून‌ देईल, असा विश्वासही धंगेकर यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT