Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama

#AskRohitPawar : ‘कर्जत-जामखेड’ने लढायला शिकवलंय...त्यामुळे कधीही कर्जत-जामखेडच : रोहित पवारांनी सांगितले आगामी निवडणुकीचे गणित

करमाळ्याचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना आपण का नाही घेतला चालवायला?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. त्यांनी रविवारी #AskRohitPawar हा नेटिझन्सच्या प्रश्नाला उत्तरे देणारा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात त्यांना एका नेटकऱ्याने ‘कर्जत जामखेड की हडपसर’ असा प्रश्न आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने विचारला होता. त्यावेळी त्यांनी सहाजिकच ‘कर्जत-जामखेड’चीच निवड केली. (upcoming assembly election will contest from Karjat-Jamkhed or Hadapsar? Rohit Pawar gave this answer...)

रोहित पवार यांच्या #AskRohitPawar या कार्यक्रमात प्रश्नांचा अक्षरशः पाऊस पडला. त्यात त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ‘कर्जत जामखेड की हडपसर’ असा निवडणूक लढविण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी रोहित पवार यांनी ‘कर्जत-जामखेड’ने लढायला शिकवलंय.. मी जो आहे तो त्यांच्यामुळेच आहे. तेच माझं कुटुंब आहे...त्यामुळे कधीही कर्जत-जामखेडच... असं उत्तर दिलं आहे.

Rohit Pawar
BJP News: भाजपशी एकनिष्ठ राहायचे अन्‌ कमळाचाच प्रचार करायचा : मंदिरात दिली शपथ; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा

कर्जत जामखेडशिवाय पुणे जिल्ह्यातील हडपसर आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या दोन मतदारसंघाची चर्चा रोहित पवार यांच्या अनुषंगाने होत असते. पण आमदार पवार यांनी तशी इच्छा कधीही जाहीरपणे बोलून दाखवलेली नाही. पण, हडपसर ही त्यांची सासूरवाडी असून या मतदारसंघात राष्ट्रवादीला मानणारा वर्ग मोठा आहे. तसेच, करमाळा हे ‘बारामती ॲग्रो’चे कार्यक्षेत्र आहे. त्यांच्या कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे याच तालुक्यातील. त्यादृष्टीने रोहित पवार यांची या दोन्ही मतदारसंघाबाबत चर्चा होत असते. तसे ती #AskRohitPawar या कार्यक्रमातही दिसली.

Rohit Pawar
ShahajiBapu Patil News : गुवाहाटी दौरा गाजवणारे शहाजीबापू पाटील आयोध्येला का गेले नाहीत? : हे आहे कारण...

करमाळ्याचा आदिनाथ सहकारी साखर कारखाना आपण का नाही घेतला चालवायला? आपल्याकडून खूप अपेक्षा होत्या, तुम्ही घेतला असता तर आम्हाला चांगला दर भेटला असता, अस प्रश्न एकाने विचारला. त्यावर करमाळ्यातील कारखान्याच्या बाबत काही राजकीय अडचणी आल्या. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पर्याय उभा केला आहे, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.\

Rohit Pawar
Former CM Car Accident : नशीब बलवत्तर....एअरबॅग उघडली अन्‌ माजी मुख्यमंत्री थोडक्यात बचावले!

माझ्या अडचणीत का वाढ करता?

एका नेटकऱ्याने तुम्ही लग्न कधी करणार आहात, असा प्रश्न विचारला आहे. त्यावर रोहित पवार यांनी मजेशीर उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, हा प्रश्न तुमच्याबद्दल होता की माझ्याबद्दल? चुकून असा प्रश्न मला विचारून माझ्या अडचणीत का वाढ करता? पंधरा वर्षांपूर्वी विचारलं असतं, तर उत्तर देऊ शकलो असतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com