Pune Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे (Vasant More) यांना पुण्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुण्यात आता महायुतीचे मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे.
या तिरंगी लढतीचा फटका महाविकास आघाडीला (MVA) बसू शकतो असं बोललं जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वसंत मोरे यांच्या उमेदवारीवरून टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आज (8 एप्रिल) पुण्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी आव्हाड म्हणाले, वसंत मोरे आणि वंचित हे गणितच मला कळत नाही. वसंत मोरे हे काय कलाकार आहेत. त्यांची कलाकारी काय आहे हे मला समजलेलं नाही. मी पण कलाकार आहे, पण मला ते मोठे कलाकार वाटतात, अशी खोचक प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वसंत मोरे यांच्यामध्ये असे कोणते संविधानातले गुण बघितले? संविधानासाठी लढताना त्यांना कुठे बघितले? ते कुठल्या आंदोलनात आघाडीवरती होते? कुठल्या दलितांच्या मदतीसाठी ते गेले होते.? असे अनेक प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केले.
वसंत मोरेंना दिलेली उमेदवारी हे गणितच आपल्याला कळत नसल्याचं सांगत वसंत मोरे यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या मतांचं विभाजन करण्यासाठी उभं केलंय का? असा सवालही आव्हाडांनी या वेळी उपस्थित केला. तसेच वसंत मोरेंना उमेदवारी देऊन महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची मुरली वाजवायची तर नाही ना? असा संशयही आव्हाडांनी व्यक्त केला.
तसंच वंचित आणि शोषित मतदारांना हे चांगलं ठाऊक आहे की, संविधान काढलं जाणार आहे आणि ते काढलं गेलं तर आपले काय हाल होईल हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे मतदार योग्य ठिकाणी आपला कौल देतील, असा विश्वासही आव्हाडांनी व्यक्त केला.
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.