Jitendra Awhad Vs Ajit Pawar : 'अजित पवारांच्या वाट्याला पंचपक्वान्न होती, मात्र...' ; जितेंद्र आव्हाडांनी लगावला टोला!

Loksabha Election 2024 : 'इथे आपण दादा होतो मात्र तिथे जाऊन त्यांना दा म्हणायलाही भीती वाटते,' असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं.
Jitendra Awhad, Ajit Pawar
Jitendra Awhad, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आज(सोमवार) सायंकाळी पुण्यातील नांदेडफाटा येथे ते एका मेळाव्याला संबोधित करणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा अचानक रद्द होऊन ते चंद्रपूरला रवाना झाले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

पुण्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला, जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'पूर्वी अजित पवारांना पुणे शहराबाबत अथवा लोकसभेच्या, विधानसभेच्यावर इतर उमेदवारांच्या याद्यांबाबत चर्चा करायची असेल तर ते पुण्यात येऊन शरद पवार यांच्याशी चर्चा करायचे आणि अंतिम निर्णय होत होता. अजित पवारांच्या वाट्याला पंचपक्वान्न होती, मात्र कधी कधी माणसाला ती नकोशी होतात आणि पत्रावळीवर जाऊन बसतात.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jitendra Awhad, Ajit Pawar
Lok Sabha Election: ...म्हणून विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका, अजितदादांची पदाधिकाऱ्यांना तंबी

'राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजित पवार(Ajit Pawar) येणार असतील तर त्यांची वाट बघितली जायची. मात्र, आता अजित पवारांना तिकडे जाऊन मला कधी बोलवतात, असं म्हणत ताटकळत बसत आहेत. त्यांनाही मनातून आपण आपली काय अवस्था करून घेतली आहे, याचं वाईट वाटत असणार. इथे आपण दादा होतो मात्र तिथे जाऊन त्यांना दा म्हणायलाही भीती वाटते. माणसं कधी कधी कर्माने आणि आपल्या कृतीने अडचणी येत असतात. भविष्यात इतिहासामध्ये अजित पवार हे एक उदाहरण असतील जे भरलेले ताट सोडून पत्रावळीवरती जाऊन बसले,' अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केली.'

तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा होईल त्यानंतर शरद पवार हे अंतिम निर्णय घेतील आणि उमेदवाराबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

याशिवाय एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, एकनाथ खडसे यांच्या मनाला पटलं म्हणून ते भाजपमध्ये गेले. आता त्यांच्याबाबत जास्त काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. मात्र, प्रत्येकाला आपलं मत असतं आणि रोहिणी खडसे यांना आपलं मत आहे म्हणून त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

Jitendra Awhad, Ajit Pawar
Vijay Shivtare News : शिवतारेंचा असाही यू टर्न; सुनेत्रा पवारांना म्हणाले, 'तुम्ही दिल्लीला जा आम्ही...'

आव्हाड म्हणाले, पुण्यातील गुन्हेगारी ही मुंबईपेक्षाही भयंकर झाली असून, पुण्याचे पालकमंत्री हे चंद्रपूर, इंदापूर ,अमेरिका, इंग्लंड सगळीकडे फिरत असतात. सगळ्यांवरती टीका करत असतात मात्र पुण्यावरती काहीच बोलत नाहीत, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com