Hemant rasne, Dheeraj Ghate, Ganesh Beedkar Sarkarnama
पुणे

Pune Bjp : धंगेकर पडले, धीरज घाटे, हेमंत रासने आमदारकीच्या उमेदवारीसाठी लढले !

Pune Lok Sabha Election 2024 Result : लावा ताकद...कसबा आपलाच ! असा विश्वास आता भाजप नेत्यांना वाटू लागल्या आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये आमदार रवींद्र धंगेकरांना 12000 मतांनी विजयी करणाऱ्या कसब्यानेच लोकसभा निवडणुकीत धंगेकरांचा घात केला आहे. एकीकडे मुरलीधर मोहळ यांनी कोथरूड विधानसभा मतदार संघातून मोठी आघाडी घेतली. तर रवींद्र धंगेकर यांना ते आमदार असलेल्या कसब्यातून पिछाडीवर राहिला लागले. यामुळे ता कसब्यातून इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्यांच्या अशा पल्लवीत झाल्या असून आपल्यामुळेच कसब्यात भाजप उमेदवार मुरलीधर  मोहोळ यांना मताधिक्य मिळाले असल्याचे ते ठासून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या माध्यमांतून आपल्या उमेदवारीचा खुट्टा मजबूत करण्याचा प्रयत्न या नेत्यांकडून करण्यात येत आहे. 

पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदा चौरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांच्यासह  ३२ उमेदवार रिंगणात होता. मात्र खरी लढाई ही मोहळ विरुध्द धंगेकर अशी झाली. सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीमध्ये शेवटी रवींद्र धंगेकर यांनी लढत निर्माण केली. काँग्रेसने देखील पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये आपली राज्यातील ताकद लावून नागपूर येथील दहा आमदारांना वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात ऍक्टिव्ह केलं होतं. तसेच राहुल गांधी यांची सभा देखील घेण्यात अली. मात्र याचा जास्त फायदा धंगेकर यांना झालेला पहिला मिळाला नाही. 

कोथरूड, वडगावशेरी, पर्वती, कसबा आणि शिवाजीनगर या पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांना आघाडी मिळाली. कोथरूड आणि पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये मिळालेले मोठे मताधिक्य मोहोळ यांना तरणारे ठरले. कोथरूड मध्ये मुरलीधर माेहोळ ७४ हजार ४०० तर पर्वती मध्ये २९ हजारांची आघाडी मोहोळ यांना मिळाली. तर पुणे कॅन्टोन्मेंट रविंद्र धंगेकर यांचा वारू सुसाट धावला तिथे त्यांना १६ हजरांचे लीड मिळाले. तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सामना जवळपास बरोबरीत सुटला असल्याचे दिसले. या ठिकाणी अवघे ३ हजारांचे मताधिक्य मोहळ यांना घेता आले. तर वडगावशेरी येथे १४ हजारांचे लीड मिळाले आहे.

मात्र धंगेकर आमदार असलेल्या कसबा मतदार संघात मोहोळ यांनी १५ हजरांचे लीड मिळाले.हे लीड मिळावे यासाठी भाजप सह महायुतीच्या नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. आता कसब्यात अपेक्षित यश मिळाल्यानंतर भाजपला  आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आपण बाजी मारू असा विश्वास वाटू लागला आहे. त्यामुळे या विजयात आपला मोठा वाट आहे. हे दाखवण्यासाठी कसब्यातील विधानसभा इच्छुकांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. मोहोळ विजयी झाल्यानंतर भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी कसाब पेठ मतदार संघात मोठ्या प्रमाणात पोस्टर लावले. हे लागले पोस्टर चर्चेत आल्यानंतर हेमंत रासने यांनी देखील मोठ्या प्रमाणात पोस्टर बाजी केली. या मध्य माध्यमातून हे नेते आगामी विधानसभेसाठी आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोले जात आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT