Vasant More : सोशल मीडियावर हिरो, पुण्याच्या मैदानावर वसंत मोरे झिरो !

Pune Lok Sabha Election 2024 Winners : सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत असे सांगणाऱ्या वसंत मोरेंना त्यांच्या फॉलोवर्सचा तितका फायदा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे सोशल मीडियात हिरो असणारे वसंत मोरे पुण्याच्या मैदानावर झिरो ठरल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
Vasant More
Vasant MoreSarkarnama

Pune Lok Sabha Result 2024 : मनसेमध्ये राहून आपल्याला पुणे लोकसभेची निवडणूक लढवता येणार नाही याची जाणीव झाल्यानंतर मनसेला सोडचिट्टी देऊन वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढले. मात्र त्यांच्या हाती मोठ अपयश आला आहे.

साधं डिपॉजिट देखील त्यांना वाचवता आले नाही. त्यामुळे माझे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत असे सांगणाऱ्या वसंत मोरेंना त्यांच्या फॉलोवर्सचा तितका फायदा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे सोशल मीडियात हिरो असणारे वसंत मोरे पुण्याच्या मैदानावर झिरो ठरल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिट्टी दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले.मात्र महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांना मैदानांत उतरवल्या नंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली त्यांना आपण विजयी होणार याचा विश्वास होता. प्रत्यक्षात मात्र त्यांना मागील निवडणुकीतील वंचितच्या उमेदवारा इतकी मत देखील घेता अली नाही.

निवडणुकीत वंचितचे वसंत मोरे यांना ३२ हजार १२ मते मिळाली. गेल्या  लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार अनिल जाधव यांना ६४ हजार ७३४ मते मिळाली होती. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत निम्म्याने कमी मते हि त्यांना मिळाली आहेत. वसंत मोरे यांच्या सारखा तगडा उमेदवार यंदा वंचित कडून मैदानांत असताना मोठी अपेक्षा होती.

मात्र फार मोठी निराशा यांच्या हाती लागली आहे. वसंत मोरे हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असतात त्यांच्या पोस्टला लाखोंनी लाईक मिळतात. ह्या लाईक प्रत्यक्षता निवडणुकीत उपयोगात येणार का ? याबाबत चर्चा होती सुरु होती. आणि आता निवडणुकीनंतर यांच उत्तर सर्वाना मिळालं आहे.

Vasant More
Ravindra Dhangekar: पराभवानंतर धंगेकरांचे हे 'दंगे' चर्चेत... 

पुणे लोकसभेच्या मैदानात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर  यांच्या बरोबर ३५ उमेदवार होते. या प्रत्येक उमेदवाराला अर्ज भरताना त्यासोबत  २५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागते. आणि तर एकूण वैध मतांच्या एक षष्ठमांश मते त्या उमेदवारांना  मिळाली नाही तर ती अनामत रक्कम जप्त होते.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा नियम आहे. पुणे मतदारसंघातील १० लाख ९७ हजार ११२ मते वैध ठरली होती. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला किमान म्हणजे एक लाख ८४ हजार मते मिळवणे अपेक्षित होते.

मोहोळ आणि धंगेकर वगळता इतर एकाही उमेदवाराला तेवढी मते मिळविता आली नाहीत. मोरे यांना ३२ हजार १२, मिळाली. अन्य उमेदवारांना  तर जेमतेम एक हजारापर्यंत मते मिळाली. त्यामुळे या सर्वांची अनामत रक्कम जप्त करण्यात अली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com