Pune Political News : केंद्रात सत्ताधारी असलेल्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने महायुतीच्या माध्यमातून 'अब की बार चार सौ पार ' अशी घोषणा करत राज्यात 45 लोकसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. महायुतीचा हा डाव उधळून लावण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील कंबर कसली आहे.
पुणे जिल्ह्यातील लोकसभेच्या जागा लढविणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी Priyanka Gandhi यांच्यासह महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे मैदानात उतरणार आहेत. यासाठीचे जोरदार नियोजन केले जात आहे.
उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे शहरात प्रियांका गांधी (Priyanka Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा रोड शो तर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अन्य महत्त्वाच्या नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित केल्या जाणार आहेत. पुणे जिल्ह्यात समावेश असलेल्या पुणे शहर, बारामती, शिरूर आणि मावळ या मतदार संघात महायुतीने आपले उमेदवार उतरवले आहेत.
या चार मतदार संघापैकी दोन मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) उमेदवार तर एका मतदार संघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा (Shivsena) उमेदवार आणि पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. यातच 18 तारखेला हे तीनही उमेदवार एकत्र अर्ज भरणार नाना पेठेत शरद पवारांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार प्रचार प्रमुख मोहन जोशी (Mohan Joshi) यांची माहिती दिली आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख एकेकाळी पुणे लोकसभा मतदार Pune Loksabha Constituency संघाची होती. काही अपवाद वगळता काँग्रेस विचारसरणीच्या उमेदवाराने लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळविला आहे. माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी देखील अनेक वर्षे पुण्यातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.
केंद्रात केल्या दहा वर्षापासून भाजपचे सरकार आहे. भाजपचा BJP उमेदवार पुणे लोकसभेला विजयी होत आहे. असे असले तरी आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग पुणे शहरात आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीचे loksabha Election काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य पाहता काँग्रेसच्या विचारांना साथ देणारा मतदार पुणे शहरात असल्याचे समोर आले आहे.
काँग्रेस उमेदवाराला मिळालेली मते आणि गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने राबवलेली चुकीचे धोरणे यामुळे नागरिकांच्या मनात असलेला रोष लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून MVA प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेमध्ये झालेल्या फुटी नंतर उद्धव ठाकरे Uddhav thackeray आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बाबत नागरिकांच्या मनात मोठी सहानुभूती आहे याचे रूपांतर मतांमध्ये कसे करता येईल याची रणनीती महाविकास आघाडीकडून आखली जात आहे.
राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे ‘रोड शो’ आणि शरद पवार यांच्या सहा विधानसभा मतदारसंघांत सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही निवडणूक मोदी आणि मोदी विरोधक अशीच आहे.
मोदी विरोधकांची अधिकाधिक मते काँग्रेस उमेदवाराच्या पारड्यात कशी पडतील यासाठीचे प्रयत्न महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी करत आहेत. यासाठी वेगवेगळ्या स्तरावर बैठक देखील घेतल्या जात असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांने सांगितले.
Edited By : Rashmi Mane
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.