Lok Sabha Election 2024 पवारांच्या कर्तृत्वाचा निखारा पेटून उठेल तसे पक्ष प्रवेश होतील, कोल्हेंचं सूचक विधान

Madha Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये आज मोठा पक्ष प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार यांना भेटणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
Sharad Pawar, Amol Kolhe
Sharad Pawar, Amol Kolhe Sarkarnama
Published on
Updated on

Amol Kolhe On Sharad Pawar: "शरद पवारांचे (Sharad Pawar) विचार आणि कर्तृत्व हा एक प्रकारचा निखारा आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते केवळ या निखार्‍यावरील राखेला फुंकर घालण्याचे काम करत असतात." असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये आज मोठा पक्ष प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.

धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) आज शरद पवार यांना भेटणार आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या भेटीवेळी मोहिते-पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रवेशाबाबतची आज अधिकृतरित्या घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच पक्ष प्रवेशाबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महात्मा फुले (Mahatma Phule) यांच्या जयंतीनिमित्त महाविकास आघाडीच्या (MVA) बारामती, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी फुले वाडा येथे जाऊन अभिवादन केलं. या नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोल्हे यांच्यासोबत खासदास सुप्रिया सुळे (Supriya Sule) यादेखील उपस्थित होत्या.

अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, इथे येऊन आवर्जून शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकामधील काही ओळी आवर्जून वाचल्या. आपला देश कृषीप्रधान असूनही देशामध्ये पूर्ण वेळ कृषीमंत्री नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. या सरकारला शेतकऱ्यांबाबत कुठलाही कळवळा नाही. म्हणून आता शेतकऱ्याचा आसूड उगारला गेला पाहिजे असं कोल्हे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच पाच वर्ष शिरूरला (Shirur) खासदारच नव्हता, अशी टीका शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी केली होती. यावर बोलताना कोल्हे म्हणाले, आढळराव पाटील हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी बोलण्याऐवजी फक्त टीका करत आहेत. त्यांच्याकडेच बोलण्यासारखं काही नाही त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत. मात्र मी त्यांचं वय पाहता त्यांना एवढ्याच शुभेच्छा देतो कि, 'गेट वेल सून' अशी खोचक प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली.

Sharad Pawar, Amol Kolhe
Ajit Pawar News: शिवतारेंना कोणाचा फोन? दादा म्हणतात, "मला मूर्ख समजू नका..."

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये होत असलेला पक्षप्रवेशबाबत बोलताना कोल्हे म्हणाले, शरद पवारांच्या कर्तुत्वाचा गारुड महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजूनही बाकी आहे. हे मी आपल्याला वारंवार सांगत आलो आहे. शरद पवारांनी घेतलेली भूमिका प्रत्येकाला पटत असून ती भूमिका आता सर्वजण पुढे येऊन मांडत आहेत.

Sharad Pawar, Amol Kolhe
Sachin Ahir : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळेच रवींद्र धंगेकरांचा प्रचार थांबवला?

शरद पवारांचे विचार आणि कर्तृत्व हा एक प्रकारचा निखारा असून या निखार्‍यावरील राखेला फुंकर घालण्याचे काम आमच्यासारखे कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे तो निखारा आणखी पेटून उठत असून पुढे आणखी मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होतील असं सूचक वक्तव्ये कोल्हे यांनी केलं.

(Edited By Jagdish patil)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com