Pune Political News : पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत मात्र पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यापुढे काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या रुपाने तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे पुण्याची लढत ही एकतर्फी नसून तुल्यबळ झाल्याची चर्चा आहे. पुण्यात मतदान कमी झाल्याने पुणेकर नेमके कुणाला कौल देणार, याकडे लक्ष आहे. आता मतदान संपताच पुण्यात लागलेल्या भावी खासदारांचे फलक लक्षवेधी ठरू लागले आहेत.
पुणे लोकसभा Pune Lok Sabha Election मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात सोमवारी (ता. 13) मतदान पार पडले. पुण्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 44.90 टक्के मतदान झाले आहे. हे मतदान झाल्यानंतर लगेच भावी खासदाराचे बॅनर झळकले आहेत. हे बॅनर भाजपच्या माजी नगरसेवकांनी लावले आहेत. यावर खासदार मुरलीधर मोहोळ यांना हार्दिक शुभेच्छा, असा उल्लेख करण्यात आला आहे.
माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी पुण्यातील पाषाण परिसरात हे बॅनर लावले आहेत. मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांच्या फोटोसह कर्वे रोड ते कर्तव्य पद असा बॅनरवर उल्लेख आहे. पुण्यातील मतदान झाल्या झाल्या झळकलेल्या या फ्लेक्सने नागरिकांसह राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
दरम्यान, पुण्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धगेंकरांनी Ravindra Dhangekar भाजपवर पोलिसांच्या बंदोबस्तात पैसे वाटल्याचा आरोप करत रविवारी रात्री आंदोलन केले होते. त्यातच सोमवारी पुणे लोकसभेतील कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त 51.07 टक्के तर सर्वात कमी 38.73 टक्के शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात मतदान झाले आहे. आता हे मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार याची आकडेमोड करण्यात पुणेकर दंग आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 44.90 टक्के मतदान झाले आहे. यात कसबा पेठ विधानसभा 51.07, कोथरूड 48.91, पर्वती 48.80, पुणे कॅन्टोन्मेंट 44.01, शिवाजीनगर 38.73 तर वडगाव शेरीत 40.50 टक्के मतदान झाले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.