Virar News : देश सांभाळण्याची धमक फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्येच आहे. भाजप हा पक्ष देशाची निःस्वार्थ सेवा करतोय, बाकी सर्व विरोधी पक्ष आपली घराणेशाही जपण्यात आणि सत्तेत येण्याची धडपड करण्यात गुंतले आहेत, अशी टीका केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी वसईत केले.
भाजपचे उमेदवार डॉ. हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह सोमवारी सायंकाळी वसईत आले होते.सनसिटीच्या मैदानात त्यांची जाहीर सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विवेक पंडित,पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी खा. राजेंद्र गावित यावेळी उपस्थित होते. यावेळी शाह यांनी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली.
एकनाथ शिंदे हे खर्या शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे हे फक्त सत्तेसाठी कसाबला पाठीशी घालणार्यांच्या मांडीवर बसले आहेत.शरद पवार,उद्धव ठाकरे,राहुल गांधी,ममता बॅनर्जी प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत.पाकिस्तानी झेंडा हाती घेणारे पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊ शकत नाहीत.सत्तेवर आल्यावर तिहेरी तलाक परत आणणार, ३७० कलम पुन्हा लावणार,अशी भाषा करीत आहेत.
नाना पटोलेंना धर्म समजत नाही.ते राम मंदिराचे शुध्दीकरण करण्याची भाषा करत आहेत.देशाची चिंता महाविकास आघाडीला नाही,सोनिया गांधी राहुलला प्रधानमंत्री बनवण्याची स्वप्ने पहात आहेत.तर शरद पवार-सुप्रिया सुळेंना,उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला, ममता-बिजुला आणि लालु-मुलाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी धडपडत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत ११ व्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशाला प्रधानमंत्री झाल्यावर नरेंद्र मोदींनी ७ व्या क्रमांकावर आणून ठेवले आहे.
ते तिसर्यांदा प्रधानमंत्री झाल्यावर आपला देश अर्थव्यवस्थेत तिसर्या क्रमांकावर असेल, अशी आशा व्यक्त करतानाच शाह यांनी पालघरमधील प्रश्नावर भाष्य केले.वसईकरांना सूर्या योजनेतून ४०० द.ल.ली.पाणी देण्याचे काम एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पालघरमधील २६ मच्छिमारांची पाकिस्तानातून सुटका,रो रो सेवा,गॅस पाईपलाईन ही कामे भाजपाने केली आहेत,असा दावा त्यांनी आपल्या भाषणातून केला.
(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)
’मशाल’ कायमची विझवा...एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांनी शाह यांची प्रशंसा केली. अनहोनी को होनी करना उनकी खासीयत है,इसका गवाह मै हू,हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,असे शहा यांचे नेतृत्व आहे.आमचे उमेदवार डॉ.हेमंत सवरा हे हाडाचे (ऑर्थो)डॉक्टर आणि हाडाचे कार्यकर्ते आहेत. ते विरोधकांची हड्डी-फसली एक करतील.
त्यांचा चांगला " इलाज," करतील.मी डॉक्टर नसलो तरी दोन वर्षापूर्वी एक सर्जरी केली होती.त्यावेळी अमित शहा माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.आता आपली पाळी आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना प्रचारात उतरवणारी ’मशाल’ कायमची विझवा, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.