Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol : मोहोळ गुलाल उधळणार की धंगेकराचा ‘हात’ बळकट होणार ? 4 जूनला 3 वाजता कळणार

Roshan More

Lok Sabha Election : पुण्याची लढत भारतीय जनता पक्षाने मताधिक्यांसाठी प्रतिष्ठेची बनवली. काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी विदर्भातून काँग्रेसचे आमदार पुण्यात ठाण मांडून होते. तर, निवडणुकीतील चुरशीमुळे भाजपच्या बड्या नेत्यांनी मोहोळांच्या विजयासाठी व्यूहरचना केल्या.

भाजप निवडणुकीत मागील वेळीचे सव्वातीन लाखांचे मताधिक्य टिकवण्यासाठी लढत आहेत. तर काँग्रेस देखील चत्मकार घडवत विजय मिळवणार असल्याचा दावा करत आहे. तेव्हा डीपी रस्त्यावरील भाजप ऑफीसपुढे की काँग्रेस भवनाच्या आवारात गुलाल उधाळणार हे चार जूनला तीन वाजता कळणार आहे.

मतदान मोजणीनंतर हळूहळू चित्र स्पष्ट होईल आणि एकतर्फी लढत झाली नाही तर दुपारी दोन पर्यंत पुण्याचा खासदार कोण? याचे चित्र स्पष्ट होईल. त्यावेळीच पुण्यात मोहोळ गुलाल उधळणार की धंगेकराचा ‘हात’ बळकट होणार हे कळेल.

भाजपने पुण्याची उमेदवार तशी उशीराच घोषित केला. त्या तुलनेत रवींद्र धंगेकर यांना लवकर उमेदवारी जाहीर झाली. त्यांनी आपला प्रचार देखील सुरू केला होता. मात्र, उशीर उमेदवारी घोषित होऊनही मोहोळांना प्रचारात आघाडी घेतली.

माजी दोन नगरसेवकांमध्ये ही लढत होत आहे. रवींद्र धंगेकर यांना आपल्या प्रत्येक पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले. तर, मोहोळांना एका मागून एक पद मिळत गेले. महापौर पदाची मुदत संपतानाच त्यांना पक्षाने संघटनेची जबाबदारी दिली. रवींद्र धंगेकर यांनी कसाब्याचा अवघड वाटणारा विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते.

तात्यांचा 'हातोडा' चालणार

काँग्रेस-भाजपमध्ये विजयाचे दावे केले जात असले तरी 'वंचित' महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. वंचितचे उमेदवार वसंत मोरे किती मतं घेणार आणि त्याच्या फटका कोणाला बसणार यावर देखील चर्चा आहे. त्यामुळे 'वंचित'चे मतदार मागील निवडणुकी प्रमाणे वंचितसोबत आहेत की नाही हे देखील चार जूनच्या निकालातून कळणार आहे.

मतदानाचा टक्का

पुणे लोकसभा मतदारसंघात 51 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. 2019 च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली.कसबा विधानसभा मतदारसंघात 59 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीत दाखवलेला चमत्कार पुन्हा धंगेकर दाखवणार का? याची चर्चा आहे. तर, कोथरुड मतदारसंघात 52 टक्के मतदान झाले. त्यामुळे भाजपची सर्वाधिक ताकद असलेला कोथरुड मुरलीधर मोहोळांना किती साथ देणार, हे पाहणे देखील औत्सुकाचे असणार आहे.

मतमोजणी आठला सुरु होणार

पुणे लोकसभा मतदारसंघाचे पोस्टल मतदान आठ वाजता सुरू होणार आहे. तर साडेआठवाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू होईल. पुणे मतदारसंघाचे मतदान 21 टेबल फेऱ्यांत मतदान संपवण्याचा प्रयत्न असणार आहेत. तर बारामती लोकसभेसाठी 24 फेऱ्या होतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT