Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Election Commission : पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वीच ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर आशिष शेलारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईत संथ गतीने झालेल्या मतदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाला धारेवर धरले होते. त्यासाठी त्यांनी मतदान होण्यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकार, केंद्र सरकारसह निवडणूक आगोयावर गंभीर आरोप केले होते. या पत्रकार परिषदेतील प्रत्येक शब्द तपासण्याचा निर्णय आता निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यातील लोकसभा निवडणूक पाचव्या टप्प्यातच पूर्ण पार पडली. या टप्प्यात देशाच्या आर्थिक राजधानीतील सहा मतदारसंघातही मतदान झाले. मुंबईत मतदानासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले होते. त्यांना मात्र अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागले. यावर मतदारांसह ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray प्रशासनाला जाबाबदार धरून निवडणूक आयोगाकडे बोट केले होते.

मतदान केंद्रावरील उडालेला गोंधळ, गैरसोय आणि कासव गतीवर उद्धव ठाकरेंनी Uddhav Thackeray थेट भाजपसह निवडणूक आयोगाला जबाबदार धरले. निवडणूक आयोगाला भाजपचा घरगडी संबोधत म्हणत केंद्र सरकार हल्लाबोल केला. आयोग अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला होता. ठाकरेंची या पत्रकार परिषदेवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलारांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Chhagan Bhujbal On BJP: मी बोलणारच...; विधानसभा जागावाटपावरून भुजबळांनी भाजप नेत्यांना घेतलं शिंगावर

मतदान होण्यापूर्वी ठाकरेंनी घेतलेली पत्रकार परिषदे ही मतदारांवर प्रभाव टाकणारी होती, याकडे शेलारांनी Ashish Shelar आयोगाचे लक्ष वेधत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार आयोगाने आता उद्धव ठाकेरेंची पत्रकार परिषदेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पत्रकार परिषदेतील प्रत्येक शब्द निवडणूक आयोग तपासून पाहणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Shiv Sena UBT Politics : कांदा उत्पादकांचा भाजप विरोधात संताप, बाजार समिती बंद पाडली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com