MIM Anis Sundke Sarkarnama
पुणे

MIM candidate Anis Sundke News : एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी भरला उमेदवारी अर्ज !

Pune Lok Sabha Constituency : मतांचं विभाजन करण्यासाठी एमआयएमला उमेदवारी दिली, अशी टीका केली जात आहे...

Chaitanya Machale

Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करत सुंडके यांनी आपला अर्ज दाखल केला. तत्पूर्वी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनीदेखील शक्तिप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला. त्यामुळे आता पुण्यात चौरंगी लढत होणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे महायुतीकडून तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले वसंत मोरे हे वंचित बहुजन विकास यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातच आता सुंडके यांनीदेखील एमआयएमकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथे चौरंगी लढत पहायला मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख एकेकाळी पुणे शहर लोकसभा मतदारसंघाची होती. काही अपवाद वगळता या मतदारसंघातून काँग्रेसचे खासदारच विजयी झाले आहेत. दहा वर्षांपूर्वी अब की बार मोदी सरकार अशी घोषणा देत भाजप लोकसभेच्या निवडणुकांना सामोरी गेली. त्यावेळी पुण्यात भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे विरुद्ध विश्वजित कदम अशी लढत झाली. त्यामध्ये शिरोळे विजयी झाले. त्यानंतर गेल्या पंचवार्षिक मध्ये २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी अशी लढत झाली. त्यामध्ये बापट विजयी झाले. बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झालीच नाही. या निवडणुकीत भाजपने मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या इच्छुकांच्या यादीत नाव न टाकल्याने नाराज झालेल्या वसंत मोरे यांनी पक्षाला राम राम केला. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन पक्षाने मोरे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे, तर एमआयएमने अनिल सुंडके यांना संधी दिली आहे. त्यामुळे ही लढत चौरंगी होणार आहे. मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपने (BJP) एमआयएमला निवडणुकीत उतरविले असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीन केला जात आहे. सुंडके यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला.

यावेळी सुंडके म्हणाले, दलित किंवा मुस्लिम (Muslim) उमेदवार उभा राहिला की, लगेच बी टीम अशी टीका केली जाते. विरोधकांनी माझ्या उमेदवारीने धास्ती घेतली आहे. पक्षाचे प्रमुख इम्तियाज जलील, वारीस पठाण यांच्या सभा घेतल्या जाणार आहेत. लवकरच पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले जाणार असून, शहरात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न बिकट झाला असून, हा प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे सुंडके यांनी सांगितले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT