Jayant Patil- Narendra Modi
Jayant Patil- Narendra ModiSarkarnama

Jayant Patil News : व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा...! जयंत पाटील यांची टीका

The government did the job of bringing : देशातील श्रीमंत कंपन्यांना सवलती देऊन बँकांना तोट्यात आणण्याचे काम सरकारनं केलं..

Pune News : व्यापारी प्रवृत्तीचा माणूस जेव्हा देशाचा प्रमुख होतो, तेव्हा लोकांना फसवण्याचे उद्योग सुरु होतात, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

भोसरी येथील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहात ते बोलत होते. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. अमोल कोल्हे, सचिन अहिर,धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे,कैलास कदम, तुषार कामठे,मानव कांबळे आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayant Patil- Narendra Modi
Jayant Patil News : जयंत पाटलांनी यासाठी मानले गृहमंत्री फडणवीसांचे आभार, म्हणाले..!

जयंत पाटील पुढे म्हणाले की, देशावर 210 लाख कोटीचे कर्ज आहे. देशातील श्रीमंत कंपन्यांना सवलती देऊन बँकांना (Bank) तोट्यात आणण्याचे काम सरकारनं केलं आहे.भारतीय जनतेची लूट करण्याची पूर्ण मुभा आहे. जीएसटीचा विषय एवढा गहन केला आहे की, चपलेपासून डोक्याच्या केसांपर्यत सगळ्या गोष्टींवर जीएसटी आहे. देशातल्या जनतेकडून पैसे लुटण्याचे काम देशातल सरकार करत आहे, हे जनतेला सांगा, असं आवाहन देखील पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं.

लोकसभेच्या निवडणूका ह्या जनतेने हातात घेतलेल्या आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद (Sharad Pawar) पवार या दोन मराठी माणसांनी स्थापन केलेले पक्ष फोडण्याचे पाप हे भाजपने केलं. हे मराठी माणसाला आवडलेलं नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला भाजपचा पराभव करायचा आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वळचणीला असलेल्या एका पक्षात जाऊन निवडणूक लढवत आहेत. म्हणून त्यांचाही पराभव करायचा आहे,असेही जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil- Narendra Modi
Revati Sule News : आईच्या प्रचारासाठी लेक मैदानात !

डॉ. अमोल कोल्हे यांच मागचा वेळी घड्याळ हे चिन्ह होत.त्यामुळे विरोधकांकडून गैरसमज पसरवण्याची शक्यता जास्त आहे. घड्याळ न्याय प्रविष्ट आहे, पण मतदारांना हे लक्षात येत नाही. म्हणून घराघरात जाऊन शरद पवारांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे हे सांगा, असेही पाटील म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Jayant Patil- Narendra Modi
Lok Sabha Election 2024 : शिरूर आणि मावळमध्ये का नाही झाल्या आतापर्यंत महिला खासदार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com