Eknath Shinde News Sarkarnama
पुणे

Eknath Shinde News: काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट, दंगली झाल्या; पण २०१४ नंतर अशी एकही घटना...

Pune Lok Sabha 2024: मोदींनी देश महासत्ता करण्याचे वचन दिले असून, ते पूर्ण करून दाखवतील. सध्याची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही, तर मोदी विरुद्ध देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींशी आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune Lok Sabha News: देशात काँग्रेसच्या काळात बॉम्बस्फोट, दंगली होत होत्या. पण, २०१४ नंतर एकही बॉम्बस्फोट झाला नाही की दंगल झाली नाही. ये तो ट्रेलर है, पिक्चर बाकी है. ही निवडणूक देशाच्या विकासाची, प्रगतीची असून येथे केवळ मोदींची गॅरंटी चालते. बाकीच्यांची गॅरंटी फेल झाली आहे. महायुतीच्या उमेदवारांना मत म्हणजे मोदींना मत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पुण्यातील लोकसभेच्या महायुतीच्या चार उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, "मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी देशातील १४० कोटी जनता आतुर आहे. हीच गॅरंटी उपस्थित अथांग जनसागराने दिली आहे. धनुष्यबाण, कमळ, घड्याळ या चिन्हांना मतदान म्हणजे मोदींना मतदान आहे. प्रत्येक उमेदवाराला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आहे. लोकांचा विश्वास मोदींसोबत आहे,"

"महाराष्ट्रातील सर्व सभा रेकॉर्ड ब्रेक होत आहेत. संपूर्ण देश प्रेम करतो, याची प्रचिती येत आहे. त्यांनी ३७० कलम हटवून दाखवून जम्मू काश्मीरला भारताशी जोडले. राम मंदिर उभे करून रामभक्तांचे स्वप्न पूर्ण केले. म्हणूनच जे ओ कहते है, जो करते है, उनको मोदी कहते है.

काँग्रेसने ६० वर्षे देश बुडविला. पण मोदींनी देश महासत्ता करण्याचे वचन दिले असून, ते पूर्ण करून दाखवतील. सध्याची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही. तर मोदी विरुद्ध देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींशी आहे. स्वप्नातदेखील मोदींच पंतप्रधान असतील, असे लोक म्हणतील,"

"विश्वासाचा दुसरे नाव मोदी, विकासाचे दुसरे नाव म्हणजे मोदी आहे. म्हणूनच 'मोदी है तो सब मुमकीन' आहे. मी दावोसला गेलो होतो, त्यावेळी उपस्थित कितीतरी इतर देशांचे राष्ट्रपती, प्रधानमंत्री भेटले. त्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांबद्दल आदर व्यक्त केला. आपल्या राज्यात पाच लाख कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक आली आहे.

हे डबल इंजिनचे सरकार काम करीत आहे. ५० वर्षांत काँग्रेसचा भ्रष्टाचाराची तुलना केली तर लोक मोदींच्या पाठीशी उभे राहितील. देशात काँग्रेसच्या काळात बॉम्ब स्फोट, दंगली हे सगळे होते होते. पण, २०१४ नंतर एकही बॉम्बस्फोट झाला नाही की दंगल झाली नाही. ये तो ट्रेलर है, पिक्चर बाकी है,"असे मुख्यमंत्री म्हणाले.

धनुष्यबाण, कमळ, घड्याळ चिन्हावर मत द्या, म्हणजे हे मत मोदींना मिळणार आहे. ही लढाई जगभरात देशाचा सन्मान वाढविणारी आहे. आपल्या चारही उमेदवारांना विजयी करा. पुणेकर हुशार आहेत. घरापुढची गाडी काढायची असेल तर ते तिची हवा काढतात. त्यामुळे आता या निवडणुकीत पुणेकरविरोधी पक्षाच्या सर्व उमेदवारांची हवा काढणार आणि चौकार मारणार, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT