Kolhapur Politics: कागलकरांनो, वचपा काढण्याची संधी सोडू नका; महाडिकांनी सतेज पाटलांच्या डावपेचावर...

Kolhapur Lok Sabha Constituency 2024: मुश्रीफसाहेब यांना पालकमंत्री मिळू नये, म्हणून त्यांनी काय खटाटोप केलेत ते मला माहिती आहे. मुश्रीफसाहेब कॅबिनेट मंत्री आणि ते राज्यमंत्री असतानासुद्धा पालकमंत्री पद त्यांनी मिळवले.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (MP Dhananjay Mahadik) यांनी कागलमध्ये जाऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांना उसकवले आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Constituency 2024) महायुती आणि महाविकास आघाडीत प्रचारात अत्यंत चुरस निर्माण होत असताना महाडिक यांनी टाकलेला डाव आणि प्रचाराची पद्धत त्यामुळे त्याला आणखी रंगत आली आहे.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन मागील विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापनेवेळी मुश्रीफ यांच्यावर काँग्रेसचे नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी कसा गेम केला, याचा दाखला देत मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांना वचपा काढण्याचे आवाहन केले आहे.

Kolhapur Politics
Rajabhau Waje News: महायुतीचं ठरेना! आघाडीकडून नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे रिंगणात...

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागल येथे झालेल्या मेळाव्यात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी, कागलकरांनी काहीतरी शिकण्याची गरज आहे. आम्ही नेहमीच सांगत आलो आहे, पण तुम्हाला वाटतंय महाडिक काहीही सांगतात. पण हा व्यक्ती आत्मघातकी आहे, द्वेशी आहे, नेहमी सुद्बुद्धीने वागतो त्याची अनेक उदाहरण आहेत, अशा शब्दांत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 मध्ये ज्यावेळी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोबत गेले. सत्ता स्थापन केल्यानंतर कोल्हापूरचा पालकमंत्री होण्याचा मान कोणाचा होता? असा सवाल करत पाच वर्षे निवडून आलेल्या मुश्रीफांचा होता की दीड वेळा आमदार राहिलेल्या आमदाराचा होता. मुश्रीफसाहेब हे प्रमुख आहेत महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख होते.

मुश्रीफसाहेब यांना पालकमंत्री मिळू नये, म्हणून त्यांनी काय खटाटोप केलेत ते मला माहिती आहे. मुश्रीफसाहेब कॅबिनेट मंत्री आणि ते राज्यमंत्री असतानासुद्धा पालकमंत्रीपद त्यांनी मिळवले. मुश्रीफसाहेब यांना अहमदनगरला जावं लागलं. मुश्रीफसाहेबांच्या तोंडातला घास त्याने काढून घेतला. यामुळे कागलकरांनी या गोष्टीचा वचपा काढला पाहिजे त्याची संधी आहे, अशा शब्दांत कार्यकर्त्यांना धनंजय महाडिक यांनी आवाहन केला आहे.

Edited by: Mangesh Mahale

R.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com