Pune Loksabha Seat :  Arvind Shinde : Prashant Jagtap
Pune Loksabha Seat : Arvind Shinde : Prashant Jagtap Sarkarnama
पुणे

Pune Loksabha Seat : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरून काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली!

सरकारनामा ब्यूरो

Pune Loksabha By Election : माजी खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभच्या जागेवर पोटनिवडणूक लढण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये काहीसा संघर्ष पाहायला मिळैत आहे. पंरपंरागत काँग्रेसच्या या जागेवर आता राष्ट्रवादीने दावा केल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी, " पक्षाने जर संधी दिली तर आपण ही निवडणुक लढवण्यास इच्छुक आहोत, अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. मात्र पुण लोकसभेची जागा ही आघाडीत काँग्रेसकडे आहे. यामुळे काँग्रेसकडून ही यावर प्रतिक्रिया उमटल्या.

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ही जागा काँग्रेसकडे आहे आणि ही जागा काँग्रेसच लढवेल असा दावा केला. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागेसाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. संपूर्ण पुणे जिल्ह्याताल चार लोकसभा मतदारसंघापैकी एकच लोकसभा काँग्रेस लढलतं. त्यामुळे काँग्रेस या जागेवर आपला दावा राखून आहे.

भाजपची टीका -

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या संघर्षावर भाजपकडून टीका करण्यात आली. भाजपचे शहराध्यक्ष जगदीप मुळीक यांनी काँग्रेस राष्ट्रवादीमधील ही राजकीय चढाओढ चुकीचे असल्याचे म्हंटले आहे. (Political Breaking News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT