Pune Political News : मनसेमध्ये राहून आपल्याला पुणे लोकसभेची निवडणूक लढवता येणार नाही, याची जाणीव झाल्यानंतर मनसेला सोडचिट्टी देऊन वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीच्या VBA तिकिटावर पुणे लोकसभेची निवडणूक लढले आहेत. या निवडणुकीचा निकाल आता पेटीबंद झाला असून 4 जून तारखेला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. तत्पूर्वी वसंत मोरे यांनी मोठा विधान केला आहे.
पुणे लोकसभेचे Pune Loksabha मतदान पार पडल्या असून सर्वच पक्षाचे उमेदवार आपापल्या कामाला लागले आहेत. लोकसभेची रणधुमाळी संपल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे Vasant More यांनी वाडेश्वर कट्ट्यावरती एकत्र येत नाश्ता केला. यानंतर त्यांनी निवडणुकी दरम्यान आलेल्या अनुभव शेअर केले.
यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरे म्हणाले, जे प्रेम मागील 32 दिवसांमध्ये मला वंचित बहुजन आघाडीमध्ये मिळालं ते प्रेम गेल्या 25 वर्षांमध्ये मला मनसेमध्ये मिळालं नाही. 18 वर्ष मनसे आणि पहिली 7 वर्ष शिवसेना असा माझा प्रवास आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं. मात्र पुण्यातील स्थानिक नेत्यांनी माझे पाय खेचण्याचा प्रयत्न केला. या कारणांमुळे रवींद्र धंगेकर आणि मी देखील पक्षातून बाहेर पडलो आहे. त्यामुळे शहरातील या पदाधिकाऱ्यांचा भविष्यात हिशोब होईल असं देखील वसंत मोरे म्हणाले.
वसंत मोरे हे मनसे सोडून आता वंचित मध्ये दाखल झाले आहे.परंतु ते कायमस्वरूपी आता 'वंचित'मध्ये राहणार का ? असा प्रश्न विचारला असता वसंत मोरे म्हणाले, मी 100 टक्के वंचित बहुजन आघाडी मध्येच राहणार आहे. याबाबतचं स्टेटमेंट मी ऑन स्टेज केले आहे. जोपर्यंत माझे डोळे उघडे आहेत. तोपर्यंत मी वंचित बहुजन आघाडी सोडणार नाही, असं वसंत मोरे यांनी सांगितले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.