Lok Sabha Election Analysis : कसब्यात पुन्हा ‘धंगेकर पॅटर्न’ की मोहोळ गड राखणार? असं आहे लोकसभेचं गणित...

Kasba Peth Assembly : कसबा विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या मागील तीन निवडणुकांमध्ये भाजपलाच मताधिक्य मिळाले आहे. प्रत्येकवेळी या मताधिक्यात वाढचं झाली आहे.
Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar
Murlidhar Mohol, Ravindra DhangekarSarkarnama

Pune News : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) पार पडल्यानंतर आता पुणे मतदारसंघात कोण बाजी मारणार, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. या मतदारसंघात प्रामुख्याने कसबा पेठ आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातून कुणाला किती मताधिक्य मिळणार, याबाबतही मोठी उत्सुकता आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवत भाजपला धक्का दिला होता. आता हाच धंगेकर पॅटर्न लोकसभेतही कायम राहणार की भाजप पराभवाचा वचपा काढणार, हे येत्या चार जूनला स्पष्ट होईल.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ (Kasba Peth Assembly) भाजपचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून गणला जातो. पण गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी हा बालेकिल्ला भेदला. लोकसभा निवडणुकीत धंगेकर यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे आव्हान आहे. कसबा मतदारसंघातून मिळालेले लीड हे उमेदवाराचा विजयाचा मार्ग सोपा करणारे ठरणार आहे. (Latest Political News)

Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar
Pune Lok Sabha Election 2024 : निवडणूक खर्चात 'लाखोंची उड्डाणे'; आढळराव अव्वल तर कोल्हे, धंगेकरही नाहीत मागे...

धंगेकर यांच्यासाठी कसबा हे हक्काचे ठिकाण तर भाजपसाठी (BJP) येथील मतदार हक्काचा आहे. कसब्याची पोटनिवडणूक जेमतेम वर्षभरापूर्वीचं झाली आहे. त्यात मिळालेल्या विजयानंतर पुण्यात धंगेकर पॅटर्न सेट झाला आणि महाविकास आघाडीने लोकसभेसाठी त्यांच्यावर विश्वास दाखवला. (Lok Sabha Election Analysis)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोटनिवडणुकीत 50.06 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीनंतर धंगेकरांनी मतदारसंघातील कामाचा वेग चांगलाच वाढवला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी 59.24 एवढी झाली. म्हणजे 9.18 टक्क्यांनी मतदान वाढले असून हा वाढलेला मतांचा टक्का कुणाच्या पारड्यात पडणार, हे निवडणुकीचा कल ठरवणारा असेल.

कसबा विधानसभा मतदारसंघात 15 ते 19 आणि 29 या महापालिका प्रभागांचा समावेश आहे. यापैकी प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपचा प्रभाव असून या भागातील सदाशिव, नारायण, शनिवार या मध्यवस्तीतील पेठांमधील मतदानाचा टक्का पोटनिवडणुकीत घसरला होता. त्याचाच फटका भाजपचे उमेदवार हेमंत रासनेंना बसला.

Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar
Pune Politics: निकालापूर्वीच पुण्यात सेलिब्रेशन सुरू; सुळे, धंगेकर, कोल्हेंच्या विजयाचे बॅनर झळकले!

पुर्व भागातील 16 ते 19 या प्रभागांतून धंगेकरांना मताधिक्य मिळाले होते. कागदीपुरा भागातून धंगेकर यांना साडेचार हजारांचे मताधिक्य होते. हे प्रभाग सातत्याने काँग्रेसला हात देत आले आहेत. प्रभाग 29 मधील लोकमान्यनगर, दत्तवाडी, सानेगुरूजी वसाहत, राजेंद्रनगर मध्ये भाजप आणि काँग्रेसलाही संधी आहे. त्यामुळे प्रभाग 15 आणि 29 मधून भाजप किती मताधिक्य घेतो, त्यावर कसब्याचा निकाल ठरणार आहे.

लोकसभेत भाजपला साथ

लोकसभा निवडणुकीत सातत्याने कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या बाजूनेच राहिला आहे. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यासाठी कसबा हे घरचे मैदान होते. त्यामुळे बापटांना कसब्याने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 65 टक्के मते दिली होती. तर 2009 मध्ये 41.60 आणि 2014 मध्ये 61 टक्के मतदान भाजपच्या उमेदवाराला झाले होते. मागील तीन निवडणुकांमध्ये या मतदारसंघातील भाजपचे मताधिक्य वाढले आहे. हे सातत्य यंदाही राहणार की पोटनिवडणुकीप्रमाणेच कसबा पुन्हा धंगेकरांना साथ देणार, हे सदाशिव, शनिवार आणि नारायण पेठेतील मतदारांवर अवलंबून असेल.

Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar
NCP Party Symbol Case : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाची सुनावणी आता जुलै महिन्यात !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com