RPI leader Ramdas Athawale and BJP leaders amid discussions over Mayor and Deputy Mayor posts in Pune Municipal Corporation. Sarkarnama
पुणे

Ramdas Athawale : रामदास आठवलेंनी फोन फिरवूनही चंद्रकांतदादा बधले नाहीत; पुण्यात महापौर आणि उपमहापौर हा भाजपचाच!

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेत यंदा भाजप महापौर व उपमहापौर दोन्ही पदे स्वतःकडे ठेवण्याच्या तयारीत असून, रिपाईची मागणी असूनही निर्णय भाजपच्या बाजूने झुकताना दिसतो.

Sudesh Mitkar

Pune PMC News : पुणे महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप आणि आरपीआय युतीचे तब्बल 97 नगरसेवक निवडून आले होते. या मोठ्या विजयानंतर भाजपने सलग तीन वर्ष उपमहापौर पद हे आरपीआयला दिलं होतं. त्यामुळे यंदा देखील तीच प्रथा कायम ठेवून उपमहापौर पद मिळावं म्हणून रिपाईच्या नेत्यांची पळापळ सुरू आहे.

असं असलं तरी यंदा महिला महापौराच आरक्षण पडल्याने भाजप उपमहापौर पद आपल्याकडे ठेवून पक्षातील वरिष्ठ नेत्याला त्यावर बसवण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे आरपीआयच्या उपमहापौर पदाच्या स्वप्नांवर पाणी फिरणार असल्याचं बोललं जात आहे.

भाजपाकडून यंदा महापौर पदावर ती कोण विराजमान होणार याची याबाबत खलबत्ता सुरू आहेत. आज देखील भाजपकडून निवडून आलेल्या नगरसेवकांची एकत्रित बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीमध्ये देखील अद्याप महापौर पदाच्या उमेदवाराचं नाव अंतिम झालेले नाही. वरिष्ठ नेत्यांचं एका नावावर एकमत होताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे हा चेंडू आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टामध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.

एकीकडे महापौर पदाची घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे रिपाईचे नेते रामदास आठवले यांच्या भेटीला गेले आहेत. यंदा देखील उपमहापौर पद आपल्याकडे यावं यासाठी भाजपला गळ घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.

रिपाईच्या नेत्यांचा असं म्हणणं आहे की पुणे महानगरपालिकेत पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले असून एक उमेदवार सुधीर वाघमोडे हे प्रभाग 2 व मधुन अवघ्या 138 मतांनी पडलेले आहेत. दोन उमेदवार दुसन्या क्रमांकावर आलेले आहेत. ही पक्षाची अतिशय चांगली कामगिरी आहे. मागील वेळेप्रमाणे यावर्षी देखील रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळावे अशी भूमिका रामदास आठवले यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे फोनद्वारे व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेवू आश्वासन त्यांना देण्यात आला आहे.

मात्र सध्या पुणे शहरातील भाजपच्या घडामोडी पाहता भाजप उपमहापौर पद आपल्याकडेच ठेवण्याच्या विचारत असल्याचं पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीनंतर अनेक दिग्गज नेते महापौर पदासाठी इच्छुक होते. मात्र महिला आरक्षण पडल्याने अनेक पुरुष दग्यजांचा हिरमोड झाला आहे.

त्यामुळे आता या दिग्गज पैकी एकाला उपमहापौर करण्याचा विचार भाजपकडून सुरू आहे. एकाला उपमहापौपद, दुसऱ्याला सभागृहनतेपद तिसऱ्याला स्थायी समिती अध्यक्षपद आणि चौथ्याला शहर सुधारणा समितीचे पद देण्याच्या विचारात भाजपचे नेतृत्व असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सुरुवातीला तरी भाजप उपमहापौर पद स्वतःकडेच ठेवण्याचा विचारत आहे. तसेच दुसऱ्या अथवा तिसऱ्या टप्प्यांमध्ये उपमहापौर पद आरपीआयला देऊ असा देखील प्रस्ताव भाजप कडून आरपीआयच्या नेत्यांना दिला जाण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT