Pune Mayor Election : 'या' तारखेला निवडला जाणार पुण्याचा महापौर, महापालिकेने केली तयारी!

PMC Pune Mayor : महापौर निवडणुकीची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहराचे महापौर कोण होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
PMC Election 2026
PMC Election 2026Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यातील सर्व महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी राज्य सरकारने कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, महापालिकांकडून महापौर-उपमहापौर निवड आणि नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा घेण्याची तांत्रिक तयारी सुरू झाली आहे.

महापालिकेच्या नगरसचिव विभागाकडून शुक्रवारी (23 जानेवारी) विभागीय आयुक्तांना यासंदर्भात पत्र पाठविले गेले. विभागीय आयुक्तांकडून दोन दिवसांत पहिल्या सभेची तारीख आणि पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्तीची माहिती महापालिकेला कळविली जाणार आहे.

राज्य सरकारच्या कार्यक्रमानुसार, 26 जानेवारीनंतरच्या दोन दिवसांत म्हणजेच 27-28 जानेवारीला महापौर-उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्यांनी नामनिर्देशनपत्र सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर 30 किंवा 31 जानेवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर आणि उपमहापौरांची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गुरुवारी महापौर पदासाठीचे आरक्षण जाहीर झाले. पुणे महापालिकेसह अनेक ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निघाले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत भाजपकडून महिला उमेदवारांची नावे चर्चेत आहेत.

मुंबईचा महापौर फेब्रुवारीमध्ये

यंदा राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्याने सर्व सभागृहे एकाच दिवशी अस्तित्वात आली. नगर विकास विभागाने मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी एकत्रित कार्यक्रम आखला आहे, ज्यामुळे कारभारात सुसूत्रता येईल. मात्र, कमी कालावधीत नामनिर्देशन, अर्ज तपासणी, सभा तयारी, नवनिर्वाचित सदस्यांना नोटीस, पासेस इत्यादी कामांसाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तरीही विभागीय आयुक्तांकडून पीठासीन अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर निश्चित होईल आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला शहरांना नवे महापौर मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com