Vikas Dangad, Devdutt Nikam  Sarkarnama
पुणे

Pune Bazar Samiti Election: विकास दांगट-पाटलांची हाकालपट्टी देवदत्त निकमांचे काय? राष्ट्रवादी काय भूमिका घेणार?

Manchar Market Committee: पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Pune APMC Election: पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली आहे. पुणे (Pune) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात लढणाऱ्या सर्वपक्षीय पॅनेलमध्ये सहभागी झाल्याने विकास दांगट-पाटील यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे दांगट-पाटील यांना लावलेला न्याय देवदत्त निकम यांना लावला जाणार का अशी चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरु झाली आहे.

पुणे आणि मंचर (Manchar) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीतच गटबाजी झाली आहे. पुणे बाजार समितीच्या निवडणुकीत पीडीसीसी बँकेचे संचालक विकास दांगट-पाटील यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.त्यांच्या हकालपट्टीची घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारकटकर यांनी मंगळवारी केली. गारटकरांच्या या हकालपट्टीच्या घोषणेला आपण फार गांभीर्याने घेत नसल्याची प्रतिक्रिया विकास दांगट यांनी दिली आहे.

दुसरीकडे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचे कट्टर समर्थक बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी बंडखोरी केली आहे. बाजार समितीचे सभापती, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) यापूर्वी देण्यात आली. मात्र, त्यांनीच पक्षाच्या विरोधात दंड थोपटल्याने तालुक्यात उलटसुटल चर्चा रंगली आहे.

दांगट-पाटील यांच्या हकालपट्टीने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे दांगट-पाटील यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने जी भूमिका घेतली तीच भूमिका देवदत्त निकम यांच्याबाबत घेतली जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दांगट यांची हाकालपट्टी केली. मात्र, निकम यांच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही. यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आंबेगाव तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे यांनी निकम यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हिंगे म्हणाले, ''एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील देवदत्त निकम यांना दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय आखाडे शिकवले. निकम हे राजकीय बारकावे ही वळसे पाटील यांच्याकडूनच शिकले. याशिवाय वळसे पाटील यांनी त्यांना भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्षपद दोनदा दिले होते. मात्र, त्यांची आताच कशी पक्षात कोंडी व्हायला लागली हा एक प्रश्नच आहे.''

आंबेगाव तालुक्यातील राजकारणात देवेंद्र शहा, विष्णू हिंगे, बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील, सुभाषराव मोरमारे, प्रदीप वळसे पाटील यांना सोबत घेऊन वळसे पाटील यांनी राजकीय मोट बांधली आहे. वळसे पाटील यांचा उत्तराधिकारी कोण, याचे उत्तर येणारा काळ आणि जनताच ठरवेल. मात्र, निकम यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे की त्यांना कुणी भरीस पाडले, हे पाहणे महत्त्वाचे आहे, असेही हिंगे यांनी नमूद केले. (Political Short Videos)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT