Ambegaon Politics : वळसे पाटलांचा उत्तराधिकारी जनता आणि काळ ठरवेल : राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी बंडखोरी केली आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sarkarnama

Manchar Bazar Samiti Election : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीत (Election) उमेदवारीवरून आंबेगाव तालुक्याचे राजकारण तापू लागले आहे. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांचे कट्टर समर्थक बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी बंडखोरी केली आहे. बाजार समितीचे सभापती, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) देण्यात आली. मात्र, त्याच पक्षाच्या विरोधात त्यांनी दंड थोपटल्याने तालुक्यात उलटसुटल चर्चा रंगली आहे. (People and time will decide walse Patil's successor: NCP's reply)

दरम्यान, वळसे पाटील यांचा उत्तराधिकारी कोण याचीही चर्चा सुरू झाली असली तरी विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे. वळसे पाटील यांचा उत्तराधिकारी कोण हे जनता आणि आगामी काळ ठरवेल, असे पक्षाचे आंबेगावत तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे यांनी स्पष्ट केले.

Dilip Walse Patil
Ambegaon APMC Election: देवदत्त निकमांची बंडाळी ठरवणार वळसेंचा २०२४ विधानसभेचा उत्तराधिकारी

हिंगे म्हणाले की, एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील देवदत्त निकम यांना दिलीप वळसे पाटील यांनी राजकीय आखाडे शिकवले. निकम हे राजकीय बारकावेही वळसे पाटील यांच्याकडूनच शिकले. याशिवाय वळसे पाटील यांनी त्यांना भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्षपद दोनदा दिले होते. मात्र त्यांची आताच कशी पक्षात कोंडी व्हायला लागली हा एक प्रश्नच आहे.

आंबेगाव तालुक्यातील राजकारणात देवेंद्र शहा, विष्णू हिंगे, बाळासाहेब बेंडे, विवेक वळसे पाटील, सुभाषराव मोरमारे, प्रदीप वळसे पाटील यांना सोबत घेऊन वळसे पाटील यांनी राजकीय मोट बांधली आहे. वळसे पाटील यांचा उत्तराधिकारी कोण, याचे उत्तर येणारा काळ आणि जनताच ठरवेल. मात्र, निकम यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे की त्यांना कुणी भरीस पाडले, हे पाहणे महत्त्वाचे आहे, असेही हिंगे यांनी नमूद केले.

Dilip Walse Patil
Maha Vikas Aghadi News: मोठी बातमी! काँग्रेस-राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसला; महाविकास आघाडीतून ठाकरे गट पडला बाहेर

ते म्हणाले की, वळसे पाटील यांच्यासोबत राहून निकम यांनी गावच्या तळागाळात जाऊन राजकारणाचे धडे घेतले. वळसे पाटील यांच्या पाठिंब्यामुळे त्यांना राजकीय बाळकडू मिळाले. राष्ट्रवादी पक्ष आणि स्वत: अशी सर्वांचीच प्रतिमा उत्तम ठेवली.

शरद सहकारी बँकेची सूत्रं बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे यांच्याकडे जिल्हा दूध संघ आणि पक्ष वाढीचे कामकाज अशी कामे सोपविण्यात आली आहेत. परंतु त्यांनी कधीही इतर संस्थांमध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न केला नाही, असे हिंगे यांनी स्पष्ट केले.

Dilip Walse Patil
Sanjay Raut On Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन दिवस रजेवर गेले आहेत आणि इकडे...? राऊतांचा घणाघात

तालुकाध्यक्ष हिंगे म्हणाले की, देवदत्त निकम यांनी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्षपद आणि त्यानंतर बाजार समितीचे सभापतीपद भूषवत असताना इतर सहकारी संस्थांमध्ये डोकावून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याची वेगळ्या पद्धतीने बाहेर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. एक प्रकारे संस्थाचालकांना बदनाम करून आपली पोळी भाजून आपण किती स्वच्छ आहे, हे बिंबवण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी द्यायचा निर्णय झाला होता. निकम हे भीमाशंकर कारखान्याचे संचालक आहेत. असे असतानाही स्वतःची उमेदवारी जाहीर करून त्यांनी प्रचार सुरू केला. त्यांचा स्वार्थीपणा आता मतदारांनी ओळखला आहे.

मतदानातून चित्र स्पष्ट होईल...

वळसे पाटील यांनी निकम यांना २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली होती. आज वळसे पाटील यांच्या विरोधात घेतलेली भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसामन्य कार्यकर्त्यांना न पटण्यासारखी आहे. येत्या शुक्रवारी (ता. २८) होणाऱ्या मतदानातून ही बाब स्पष्ट होईल, अशी भावनाही हिंगे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com