Depti Chaudhary suicide Sarkarnama
पुणे

Depti Chaudhary suicide case : 6 वर्षे सहन का केलं? लढायला हवं होतं! आता दीप्ती जिवंत असती! संतप्त महिलांना रुपाली चाकणकरांचा खडा सवाल

Pune Engineer Depti Chaudhary Suicide Case: Rupali Chakankar Raises Serious Issues : पुण्यातील सोरतापवाडी इथल्या दीप्ती चौधरी आत्महत्याप्रकरणी महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत गंभीर मुद्दे उपस्थित केले.

Pradeep Pendhare

Rupali Chakankar press conference : पुण्यातील सोरतापवाडी इथली विवाहित अभियंता दीप्ती मगर-चौधरी हिच्या आत्महत्येवरून, पुन्हा एकदा पुण्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या घरच्यांची भेट घेतली. या वेळी काही महिला संतप्त झाल्या होत्या.

"सासरच्या लोकांनी पैशाशी लग्न केलं आहे का? मुलीशी केलं आहे? असा प्रश्न सध्या पडत आहे. सहा वर्षे सहन का केलं? लढले असते, तर आपल्यात दीप्ती जिवंत असती," असा प्रतिसवाल रुपाली चाकणकर यांनी संतप्त झालेल्या महिलांना केला.

पुण्यातील (Pune) वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर दीप्ती मगर-चौधरी यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. दीप्ती मगर-चौधरी यांचे सासरच्या मंडळीना राजकीय वलय आहे. दीप्तीची सासू ही भाजपची सरपंच आहे. तर सासरे हे शिक्षक आहे. एवढं असतानाच, दीप्तीच्या माहेरच्यांकडे लग्नावेळी 50 तोळे सोनं मागितलं. लग्नानंतरही तिचा छळ सुरू राहिला. गर्भपात केला. यानंतर या सर्व जाचाला कंटाळून तिने गळफास घेतल्याने, संतापाची लाट उसळली आहे.

पुण्यातील या घटनेची महिला (Women) आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दीप्तीच्या माहेरच्यांची घरी जात त्यांचे सांत्वन केले. या वेळी काही महिलांच्या आक्रोशाला चाकणकर यांना सामोरे जावं लागले. यावर रुपाली चाकणकर यांनी, एवढे सहा वर्षे सहन का केलं? लढायला हवं होतं! लढले असते, तर दीप्ती आज आपल्यात असती, असा खडा सवाल चाकणकर यांनी संतप्त झालेल्या महिलांच्या दिशेनं केला.

रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत, "घटनाक्रम सांगताना, दीप्ती चौधरी प्रकरणात उरळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पहिली मुलगी झाली. यासह अनेक कारणांमुळे सासरच्या त्रासाला कंटाळून दीप्तीने आत्महत्या केली. पती आणि सासू या दोघांना अटक केली असून 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे."

गर्भपाताची गंभीर दखल

दीप्तीचा सासरच्यांनी बळजबरीने गर्भपात केला होता. याची महिला आयोगाने गंभीर दखल घेतल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. या प्रकारची चौकशीचा आदेश दिला आहे. गर्भलिंग चाचणी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. गर्भपात कुठे झाला? कोणी केला? याची चौकशी होऊन कारवाई होईल, असे संकेत रुपाली चाकणकर यांनी दिले.

तीन नवीन कायदे, फाशीपर्यंतची तरतूद

सासरच्या लोकांनी पैशाशी लग्न केलं आहे का? मुलीशी केलं आहे? असा प्रश्न सध्या पडत आहेत. आईपणाच्या लढाईत आम्ही पुढे आलो आहोत. सासरी नांदत असताना, माहेरचे दरवाजे आम्ही उघडले आहेत. तीन नवीन कायदे जुलै महिन्यापासून महाराष्ट्रात लागू झाले आहेत. बीएनएस कायद्यांतर्गत फाशीपर्यंत शिक्षा जाईल, अशी देखील तरतूद केली आहे. या कायद्याची अंमलबजावणी नक्की केली जाईल, असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT