BJP corporators warning : कुख्यात गुंडाची 'रील व्हायरल', विखेंचा रौद्रावतार! कपडे काढून वरात काढण्याचा इशारा; नगरसेवकांना गुंडाशी मैत्री महागात पडणार

Shirdi Criminal Reels Go Viral: Sujay Vikhe Warns BJP Corporators : शिर्डीतील गुन्हेगारांबरोबर नगरसेवक दिसल्यास खपवून घेणार नसल्याचा इशारा माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिला आहे.
Sujay Vikhe Warns
Sujay Vikhe WarnsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics news : भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी, शिर्डीतील नगरसेवकांना गुंडांबरोबर दिसू नका, असे सुनावताना, शिर्डीत समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या कुख्यात गुंडांच्या रीलवर तडाखेबाज इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

'फक्त दोन दिवस द्या, या सर्वांचा कपडे काढूनच शिर्डीत वरात काढतो,' असा थेट इशारा देत सुजय विखे पाटलांनी कुख्यात गुंडांना अंगावर घेतल आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ड्रग्ज माफीयावरून राजकारण तापलं आहे. खासदार नीलेश लंके आणि माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांच्यात वाॅर रंगला आहे. एकमेकांचे कार्यकर्ते, नेते कसे ड्रग्ज तस्कारांबरोबर फिरतात, याचे फोटो व्हायरल करत आहेत. यातून ड्रग्ज माफीयांचे राजकीय संबंधांची चर्चा सुरू आहेत.

विखे अन् लंके एकमेकांच्या बालेकिल्ल्यातील गुन्हेगारीकडे देखील बोट दाखवत आहे. यातून आता शिर्डीतील (Shirdi) गुन्हेगारांबरोबर राहण्यावरून सुजय विखे पाटलांनी आपल्या नगरसेवकांना तडाखेबंद इशारा दिला आहे. गुंडांबरोबर दिसला, ते खपवून घेणार नाही, असे नगरसेवकांना सुनावताना, सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

Sujay Vikhe Warns
Mayor post price : मतं विकत घेण्यासाठी अब्ज, महापौरपदासाठी भाव पाच कोटी! ठाकरेंच्या शिलेदाराच्या दाव्यानं राजकारणात भूकंप

सुजय विखे पाटील शिर्डी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, शिर्डीतील गुंडगिरीवर निशाणा साधला. तसंच शिर्डीतील विकासासाठी सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र यावं, असं आव्हान केलं. ते म्हणाले, "शिर्डीच्या विकासासाठी एकत्र यावं. पण समोरचा चाकू मारताना, विचार करणार नाही की, हा भाजपचा गोंदकर आहे की, सेनेचा गोंदकर? शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचा कोते आहे की, कमळाचा कोते? तो चाकू मारणारच! या गुन्हेगारांविरोधात सर्व पक्षीयांनी एक मूठ करावी."

Sujay Vikhe Warns
BJP Shiv Sena tension : बीएमसी रणसंग्राम पेटला! दिल्लीचा आदेश, फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये; शिंदेंची दरे गावाकडे कूच?

'मी एक व्हिडिओ पाहिला. एक आरोपी सुटला. गाडीमध्ये येतो. काही तरी, व्हिडिओचा तमाशा केला. फक्त दोन दिवस द्या, या सर्वांचा कपडे काढूनच शिर्डीत वरात काढतो. हा सुजय विखेंचा शब्द. हा तमाशा, थांबवा. शिर्डीला आव्हान आहे, कार्यकर्ता कोणाचाही असो, पण जर गुंडगर्दी, गुन्हेगारांबरोबर दिसलात. आता टाॅलेरेस्ट लेव्हल नाही. सर्व नगरसेवकांची जबाबदारी आहे,' असे ठणकावून सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

'जेवढे गुन्हेगार कार्यकर्ते असतील, ते लांब करा, सुधारायला सांगा. नाहीतर शिर्डीतून डायरेक्ट हद्दपार करणार आहे. हे काम सुरू करतो आहे. हा तमाशा शिर्डीत स्वीकारला जाणार नाही. कोणीही असो. मतदानासाठी लाचारी पत्करणं सोडलं आहे. शिर्डी सुरक्षित राहील, महिला सुरक्षित राहतील. मुली सुरक्षित राहतील. जो शब्द विधानसभेला दिला आहे, जो शब्द नगरपालिकांना दिला आहे, तो शब्द पूर्ण करणार,' असे सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com