Pune Metro Expansion: New Shivajinagar to Yewalewadi Sarkarnama
पुणे

Pune Metro News: पुणेकरांसाठी आणखी एक मेट्रो मार्ग; 'या' परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार

Pune Metro Expansion: New Shivajinagar to Yewalewadi: शिवाजीनगरपासून येवलेवाडीपर्यंत 20 किमी लांब मार्गिका सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. हा मेट्रो प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे उद्दिष्ट आहे.

Mangesh Mahale

Pune Metro News: पुणेकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रोमार्ग दाखल होणार आहे. शिवाजीनगर ते येवलेवाडी असा २० किमी लांबीचा नवा मेट्रो मार्ग प्रस्तावित असून महामेट्रोमार्फत हा प्रकल्प राबवला जाणार आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या मार्गावर मेट्रो उभारण्याचे काम हाती घेतल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे दक्षिण पुण्यातील कोंढवा, उंड्री आणि येवलेवाडीतील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

शिवाजीनगरपासून येवलेवाडीपर्यंत 20 किमी लांब मार्गिका सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. हा मेट्रो प्रकल्प 2030-31 पर्यंत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे उद्दिष्ट आहे. हा मार्ग हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या विस्ताराचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. या मार्गावर दर एक किलोमीटर अंतरावर मेट्रो स्थानक उभारण्याचे नियोजन आहे.

दोन महिन्यांपूर्वी या प्रकल्पासाठी सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. मे-जूनपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सर्वेक्षण पूर्ण करून प्रकल्प राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल आणि पुढे केंद्र सरकारची मान्यता घेण्यात येईल.

यापूर्वी हडपसरपर्यंत मेट्रो मंजूर झाली असली तरी कोंढवा परिसरात मेट्रो सुविधा नसल्याने प्रवाशांना अडचणी येत आहे. विधान परिषदेचे स्थानिक आमदार योगेश टिळेकर यांनी कोंढवा-येवलेवाडी मेट्रो मार्गाची मागणी पावसाळी अधिवेशनात केली होती. पुणे पूर्व आणि पश्चिम भागातील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याचाही उद्देश आहे.

शिवाजीनगर ते येवलेवाडी हा प्रस्तावित मेट्रो मार्ग शिवाजीनगरपासून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प, पुलगेट, कोंढवा आणि येवलेवाडी परिसरापर्यंत विस्तारला जाणार आहे. ज्योती चौक, बिशप विद्यालयाजवळ उंड्रीपर्यंत स्पर लाइन प्रस्तावित आहे.

दक्षिण पुण्यात लोकसंख्या आणि वाहनसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी, प्रवासाचा वाढलेला वेळ आणि सार्वजनिक वाहतुकीची कमतरता या समस्या सोडवण्यासाठी या परिसरात मेट्रो विस्तार करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT