Pune Police News: पुणेकरांनो, पोलीस आता चौकातच गाठणार! 400 कोटी वसूल करण्यासाठी आखलाय मास्टर प्लॅन

Pune traffic police News: वसुली करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ऑनलाइन नोटिसा पाठवल्या आहेत. वाहनचालकांना ३० दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत दंड न भरल्यास संबंधित वाहनचालकांचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे,
Pune Police News
Pune Police NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पुणेकरांवर आता वाहतूक पोलिसांची कठोर कारवाई सुरू झाली आहे. शहरातील तब्बल १९ लाख ५९ हजार वाहनचालकांनी वाहतूक नियम मोडले असून, त्यांच्याकडून पावणे चारशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. या प्रलंबित दंडाच्या वसुलीसाठी वाहतूक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

पुणे शहर वाहतूक पोलिसांनी गेल्या चार दिवसांत ३ कोटी १३ लाख रुपयांचा दंड पुणेकरांकडून वसूल केला आहे. २०१७ पासूनच्या प्रलंबित ई-चलनांमधून एकूण सुमारे ४०० ते ४१० कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे.

या रकमेची वसुली करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ऑनलाइन नोटिसा पाठवल्या आहेत. वाहनचालकांना ३० दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत दंड न भरल्यास संबंधित वाहनचालकांचा ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) पाठवले जाणार असल्याचा पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आला आहे.

वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव यांनी सांगितले की, ही मोहीम वाहतूक शिस्त राखण्यासाठी, नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आणि पारदर्शक वसुली करण्यासाठी राबवली जात आहे. यासाठी शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांची विशेष नियुक्ती करण्यात येणार आहे.

Pune Police News
Mumbai Crime News: दादागिरी करणाऱ्या मित्राला आठवीत शिकणाऱ्या तीन मुलांनी संपवलं! असं फुटलं हत्येचं बिंग

याशिवाय, धुळवड (होळी) निमित्त शहरात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील ३० ठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार असून. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक कारवाई होईल आणि अशा वाहनांची तात्काळ जप्ती केली जाईल. यासाठी वाहतूक कर्मचारी २४ तास रस्त्यावर तैनात राहणार आहेत. त्यामुळे सर्वांनी प्रलंबित असलेला दंड तातडीने भरावा, असं आवाहन वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com