Pune Metro News Sarkarnama
पुणे

MNS News: मोदींच्या विरोधात मनसे करणार आंदोलन; हडपसर मतदारसंघाला न्याय कधी?

MNS will protest against PM Narendra Modi Pune Metro: हडपसर मतदारसंघामध्ये मागील काही वर्षामध्ये मेट्रोचा ज्यापद्धतीने विस्तार अपेक्षित होता, त्यासाठीची कोणतीही हालचाल केंद्र सरकारकडून झालेली आढळत नाही.

Sudesh Mitkar

Pune News: लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हा पाठिंबा दिल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचे (Pune Metro News) उद्घाटन करण्यासाठी पुण्यात येत असताना मनसे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाबाबतचे पत्र मनसेकडून (MNS)पोलिसांना देण्यात आला आहे.

याबाबत साईनाथ बाबर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या (ता. 26) स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो मार्गाचा भुमिपुजन सोहळा नियोजित करण्यात आला आहे. गेल्या काही काळामध्ये पुणे शहरामध्ये मेट्रोचा जो विस्तार झाला त्यामध्ये वारंवार पुण्याच्या केंद्रस्थानी असलेल्या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आल्याचे आढळते. मात्र हडपसर भागात देखील याचा विस्तार आवश्यक आहे,"

हडपसर मतदारसंघ क्षेत्रात जवळपास १० लाख नागरीक वास्तव्यास आहेत. मतदारसंघात मोठमोठे उद्योगधंदे, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, पुणे शहरातील महत्त्वाची शासकीय कार्यालये, करमणुकीची ठिकाणे, मोठमोठे मॉल अशा अनेक गरजेच्या गोष्टी असल्यामुळे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरीकांची वर्दळ पाहायला मिळते.

त्यामुळे या भागातील वाहतुक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हडपसर मतदारसंघामध्ये मागील काही वर्षामध्ये मेट्रोचा ज्यापद्धतीने विस्तार अपेक्षित होता, त्यासाठीची कोणतीही हालचाल केंद्र सरकारकडून झालेली आढळत नाही. अगदी आतासुद्धा ज्या भुयारी मार्गाचे पंतप्रधान भुमिपुजन करणार आहेत त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात पुणे शहराच्या केंद्रातील नागरिकांना होणार आहे.

मधल्या काळात हडपसरमध्ये नवीन मेट्रो प्रकल्पासाठी मंजुरी मिळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याचा पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पाचा संपुर्ण तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) देखील तयार असल्याचे आढळले होते. ज्या प्रकल्पाचे भुमिपुजन पंतप्रधान करणार आहेत त्याचबरोबर हडपसरमधील मंजुर असलेल्या प्रकल्पाचे देखील भुमिपुजन का घेण्यात येत नाही? पुणे शहरातील सर्व मतदारसंघांना समान न्याय का देण्यात येत नाही ?

हडपसर मतदारसंघाची लोकसंख्या, या भागात वाढत चाललेली वाहतुक कोंडी लक्षात घेता हडपसरमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू करणं अतिशय महत्त्वाचे असताना देखील केंद्रसरकार याकडे जर जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे. ही बाब निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हडपसर विधानसभा मतदारसंघातर्फे हडपसरकरांच्या हक्काच्या मेट्रोसाठी मोठे जनआंदोलन घेण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजता एसपी कॉलेज जवळ हे आंदोलन करण्यात येणार असून यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली आहे, अशी माहिती साईनाथ बाबर यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT