Pradeep Kand Sarkarnama
पुणे

Pune MLC election : राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून हायहोल्टेज घडामोडींनंतर पुण्याच्या निवडणुकीत भाजपची एन्ट्री; जिल्हाध्यक्षच उतरले रिंगणात

Pune Legislative Council election, Pradeep Kand nomination : विधान परिषदेची अर्ज भरण्याची वेळ संपली असून पुणे विधानपरिषदेसाठी अधिकृत पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल त्याबरोबरच अपक्ष आणि बंडखोर यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये एका मागून एक असे ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली असताना भाजपाच्या जिल्हाअध्यक्षाने थेट अपक् अर्ज दाखल केला असल्याचे समोर आला आहे. या ट्विस्टमुळे महायुतीमध्ये बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

महायुतीमध्ये ही जागा भाजपाला सुटावी यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग झाल्याचे पाहायला मिळालं. भाजपकडून पुणे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी प्रामुख्याने दोन नेते इच्छुक असल्याचे पाहायला मिळालं. मध्ये भाजपचे पुण्यातील सभागृह येथे गणेश बिडकर आणि दुसरे जिल्हाध्यक्ष असलेले प्रदीप कंद हे देखील इच्छुक होते.

राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये मात्र पुण्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे.तर डमी अर्ज म्हणून माजी आमदार सुनील टिंगरे यांनी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, विधान परिषदेची अर्ज भरण्याची वेळ संपली असून पुणे विधानपरिषदेसाठी अधिकृत पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल त्याबरोबरच अपक्ष आणि बंडखोर यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय, त्यांचा डमी अर्ज म्हणून तुषार कामटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपचे जिल्ह्याचे नेते प्रदीप कंद यांनीही अपक्ष अर्ज भरला असल्याची माहिती आहे. प्रदीप कंद अजित पवार यांची निकटवर्तीय होते. त्यांनी काही वर्षांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. सध्या ते पुणे जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे या निवडणुकीतून ते माघार घेणार की महायुतीतच लढत पाहायला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT