Pune MNS Sarkarnama
पुणे

Pune MNS : झोपलेली मनसे अखेर जागी झाली; अन् पुण्यात तोडफोड केली, गुन्हे दाखल...

Sainath Babar, Ajay Shinde : इंग्रजी फलकांना काळे फासले, सिमेंटचे ब्लॉग दुकानांवर फेकल्याचा आरोप

Sunil Balasaheb Dhumal

चैतन्य मचाले

Pune Political News : दुकानावर मराठी पाट्या लावण्यावरून काही दिवसांपासून पुण्यात झोपी गेलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) शुक्रवारी आक्रमक झाली. जंगली महाराज रस्ता, टिळक रस्त्यावरील ज्या दुकानांनी मराठी भाषेतील पाट्या लावल्या नाहीत, या दुकानाकडे मोर्चा वळवत मनसेने आंदोलन केले. काही दुकानांवर सिमेंटचे ब्लॉग फेकल्याचा आरोप काही दुकानदारांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी आठ ते नऊ मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

दुकानदारांनी आपल्या दुकानांवर मराठी भाषेतील पाट्या लावाव्यात, असे आदेश कोर्टाने दिलेले आहेत. त्यानुसार महापालिकेने शहरातील सर्व दुकानदारांना नोटीस पाठवून मराठी भाषेत पाटी लावावी, असे कळविले होते. ही मुदत 25 नोव्हेंबरला संपली. मात्र, त्यानंतरदेखील शहरातील अनेक दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नसल्याचे समोर आले होते.

दरम्यान, कोर्ट तसेच पालिकेने आदेश दिल्यानंतर त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे वृत्त 'सरकारनामा'ने प्रसिद्ध करून याकडे लक्ष वेधले होते. कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन मनसेने दुकानदारांना केले होते. परंतु याकडेदेखील दुर्लक्ष करण्याची भूमिका काही दुकानदारांनी घेतली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पार्श्वभूमीवर आक्रमक होत पुण्यात मनसेने जोरदार आंदोलन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ज्या दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या नव्हत्या अशा दुकानांवरील इंग्रजी पाट्या फोडल्या. जंगली महाराज रोड, टिळक रोड येथे हे आंदोलन झाले.

पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात 20 ते 25 कार्यकर्ते सहभागी झाले होते. हे आंदोलन करताना मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजी फलकांना काळे फासले तर काही कार्यकर्त्यांनी सिमेंटचे ब्लॉग दुकानांवर फेकल्याचा आरोप केला जात आहे. आंदोलन करणाऱ्या आठ ते नऊ मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT