NCP leader Ajit Pawar reacts as exit polls project his party as kingmaker in Pune municipal elections. Sarkarnama
पुणे

Pune Muncipal Exit Polls : पुण्यात धक्कादायक निकाल! एक्झिट पोलमध्ये अजितदादा ठरले 'किंग', भाजपचे स्वप्न भंगणार?

Pune Muncipal Election Exit Polls BJP Vs NCP : पुणे महापालिका निवडणुकीच्या एक्झिट पोलने भाजपची धडधड वाढली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कामगिरीने भाजप सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे.

Roshan More

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागण्याचा अंदाज साम टिव्हीच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. नगरपंचायत निवडणुकीत सामचा एक्झिट पोल अचूक ठरला होता. त्यामुळे पुणे महापालिकेच्या एक्झिट पोलने भाजपची धडधड वाढली आहे.

'साम'च्या एक्झिट पोलनुसार भाजप सर्वात मोठा पक्ष ठरतो आहे. मात्र, स्वबळावर त्यांना सत्ता मिळत नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी देखील सर्वांना चकीत करत असून भाजपपेक्षा केवळ पाच जागांनीच पिछाडीवर या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार पुण्यात भाजपला 70 जागा मिळत असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, एकनाथ शिंदेंची शिवसेनेला 12 जागा मिळत आहेत. या आकडेवारीनुसार पुण्यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नसून ही महापालिका त्रिशंकू होत आहे. त्यामुळे अजित पवारांना भाजपला दूर ठेऊन इतर पक्षांना एकत्र आणत सत्ता स्थापन करू शकता.

शरद पवारांच्या साथीचा मोठा फायदा

एक्झिट पोलनुसार शरद पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मिळाल्याने अजित पवारांची कामगिरी सुधारली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55 जागा मिळूत असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळत नाही. त्यामुळे दोघांचा आकडा 65 पर्यंत पोहोचत आहे.

विरोधकांची कामगिरी कशी?

पुणे महापालिकेत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कामगिरी अपेक्षित होत नसल्याना दिसत आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेसला केवळ 8 जागा तर, ठाकरेंना पाच जागा मिळत आहे. तर, मनसेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT