Pune News, 18 Mar : पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची आज निवड केली जाणार आहे. आज होणाऱ्या मुख्य सभेमध्ये ही निवड केली जाणार असतानाच दोन उमेदवारांची अर्ज बाद झाले असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे आज आठच नगरसेवकांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचं समोर आला आहे.
अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपचे उमेदवार असल्याचे देखील समोर आला आहे. स्वीकृत नगरसेवकांची मुख्य सभेमध्ये निवड केली जाणार आहे. त्यामुळे ज्या दहा जणांना उमेदवारी मिळाली आहे ते आज आपण नगरसेवक होणार म्हणून आनंदात आहेत. अशातच आता त्यांच्या आनंदावर वर्जन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कारण आजच्या मुख्य सभेमध्ये दहा ऐवजी फक्त आठ जणांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड होणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. सर्वाधिक सात भाजपचे स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस कडून दोन आणि काँग्रेस कडून एक असे तब्बल दहा जणांना स्वीकृती नगरसेवक म्हणून निवडलं जाणार आहे.
भाजपकडून प्रियंका शेंडगे, जयप्रकाश पुरोहित, रवी साळवेकर,विश्वास ननावरे, उदय लेले, राजेंद्र काकडे, नीलेश कोंढाळकर यांना संधी देण्यात आली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्तात्रय धनकवडे आणि राकेश कामठे मैदानात आहे. काँग्रेसमधील एकमेव जागेसाठी सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आले आहे.
मात्र, यातील दोन उमेदवारांची कागदपत्रे अपूर्ण असल्याने ते छाननीत बाद झाले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे, आज मुख्यसभेत १० नगरसेवकांची निवड न होता फक्त ८ जणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केली जाणार आहे.
महापालिका आयुक्तांनी या उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या छाननीसाठी एक वेगळी समिती स्थापन केली होती. या समितीकडून करण्यात आलेल्या छाननी दरम्यान दोन उमेदवारांनी अर्ज दाखल करताना उशीर केला असल्याचा समोर आला आहे.
त्यामध्ये भाजपचे उमेदवार जयप्रकाश पुरोहित आणि प्रियंका शेंडगे यांचं नाव असल्याचं माहिती सूत्रांनी दिली आहे. चॅरिटी कमिशनरकडून उमेदवारी दाखल करण्यासाठी सर्टिफिकेटघेणं गरजेचं असतं. मात्र, हे सर्टिफिकेट वेळेत न मिळाल्यामुळे गोंधळ झाला आणि अर्ज भरण्यास उशीर झाला. मात्र या उमेदवारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता असून ही प्रक्रिया एक महिन्यात पुन्हा राबवून त्यांना स्वीकृत नगरसेवक करून घेण्यात येणार असल्याचे देखील सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.