

Radhakrishna Vikhe Patil statement : संगमनेरमध्ये शाळकरी मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यात अहिल्यानगरमधील भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वेगळाच संशय आहे.
'या अॅसिड हल्ल्यामागे कोणीतरी गावातील, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मुलगा असू शकतो. हे सांगताना, पोलिसांना हल्लेखोराला पकडण्यासाठी आज सायंकाळीपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे,' असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. मंत्री विखे पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांवर तपासाचा दबाव वाढला आहे.
मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, 'मुलगी शाळेतून येत होते. त्यावेळी तिच्याजवळ दुचाकीस्वाराने येत एका वस्तीची चौकशी केली. मुलीनं सांगितल की, अशी वस्ती इथं नाही, असं तिनं हल्लेखोरांना सांगितल्याचं प्रथमदर्शनी दिसतं.'
'यानंतर हल्लेखोरांनी (Crime) अॅसिडची बाटली काढून तिच्या तोंडावर फेकली. यात मुलीच्या उजवा भाग जळाला. तिच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत हल्लेखोरांचा सीसीटीव्ही फुटेज नाही. त्यामुळे लोकेशन मिळवण्यात अडचणी येत आहे,' असं मत्री विखे पाटील यांनी सांगितलं.
'पोलिसांना कारवाईच्या सूचना आहेत. तपास सुरू आहे. या हल्ल्यामागे गावातीलच कुणीतरी मुलगा असणार आहे. गुन्हेगार देखील असू शकतो तो. पोलिस चौकशी करत आहेत,' असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
'हल्लेखोराला अटक करण्यासाठी पोलिसांची दहा पथकं तैनात आहे. तपास करत आहेत. या हल्ल्यातील हल्लेखोराला आज सायंकाळपर्यंत अटक करण्याच्या सूचना आम्ही पोलिसांना दिल्या आहेत. अतिरीक्त पोलिस अधीक्षक यांच्या संपर्कात मी स्वतः आहे. आम्हाला अपेक्षा आहे की, आज सायंकाळपर्यंत आरोपी गजाआड असेल,' असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं.
मंत्री विखे यांनी, अशा विकृतीचे हल्ले आमच्याच मुलींवर होतात. या विकृतींना, समाजकंटकांना आळा घालण्यासाठी भविष्यात कठोर पावलं उचलावा लागतील. म्हणजे विकृती करण्याचं धाडस होणार नाही. शाळाबाह्य कृत्यांवर तर नक्कीच भविष्यात कारवाईच्या उपाययोजना कराव्या लागतील, असे वैयक्तिक मत व्यक्त केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.