PMC  Sarkarnama
पुणे

PMC News: पुणे महापालिका ठरली नंबर वन; मुख्यमंत्र्यांकडून आयुक्तांचा सन्मान

Pune Municipal Corporation ranks first in Maharashtra’s e-governance: नवल किशोर राम यांनी विविध ई-गव्हर्नन्स प्रकल्पांचा प्रगती अहवाल सादर केला. यात सात घटकांवर भर देण्यात आला होता. पुणे महापालिका राज्याच ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये राज्यात सर्वात पुढे आहे.

सरकारनामा ब्यूरो

PMC News: पुणे महापालिकेने ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात बाजी मारली आहे. राज्यात पहिला क्रमांक आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र सरकारच्या मिशन १०० दिवसांच्या कार्यक्रमात पुणे महापालिकेला चमकदार कामगिरी दाखविता आली नव्हती. पण आता १५० दिवसांच्या मिशनमध्ये मात्र ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात सर्वोकृष्ट कामगिरी पुणे महापालिकेने केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात शुक्रवारी बैठक आयोजित केली होती. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. बैठकीमध्ये राज्यातील अन्य महापालिकांनी सादरीकरण केले. काही विभागांनी आपापल्या कामाची प्रगती सादर केली. या सादरीकरणानंतर राज्यातील सर्व महापालिकांमधून पुणे महापालिकेची प्रथमक क्रमांकाने निवड झाली आहे.

नवल किशोर राम यांनी विविध ई-गव्हर्नन्स प्रकल्पांचा प्रगती अहवाल सादर केला. यात सात घटकांवर भर देण्यात आला होता. पुणे महापालिका राज्याच ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये राज्यात सर्वात पुढे आहे. १५० दिवसांच्या कालावधीत प्रलंबित कामे पूर्ण करणे आणि नागरिकांच्या हितासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचे सादरीकरणातून दाखवून दिले, असे आयुक्तांनी सांगितले.

प्रथम क्रमांकासाठी हे घटक ठरले महत्वाचे

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर

पालिकेने रोड अ‍ॅसेट मॅनेजमेंट सिस्टीम आणि इंटिग्रेटेड वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीमसाठी जीआयएसचा प्रभावी वापर केला आहे.

डेटा आणि अ‍ॅनालिटिक्स

४० विभागांमधील ५०० प्रमुख कामगिरी निर्देशकांसह एक केंद्रीय डॅशबोर्ड विकसित करण्याचे काम सुरू आहे. आयुक्तांनी पीएमसी स्पार्क नावाची नवीन वॉर रूम सुरू केला आहे, जिथे ५० प्रकल्पांचा दर १५ दिवसाला आढावा घेतला जातो.

एआय आणि तंत्रज्ञान

महापालिका वेबसाइट, व्हॉट्सअ‍ॅपवरील पीएमसी चॅटबॉट यावरू नागरिकांना ऑनलाइन सेवा पुरवत आहे. यापुढे क्रुत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करून मिळकतकाराची थबकबाकी वसूल करणे तक्रारींचे विश्लेषण केले जाणार आहे.

वेबसाइट आणि मोबाईल अ‍ॅप्स

पुणे महापालिकेने मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये ३६ मायक्रो-साइट्ससह मोबाईल-फ्रेंडली नवीन संकेतस्थळ विकसित केले आहे. वर्षभरात ६७ लाख नागरिक या संकेतस्थळाचा वापर करतात. पीएमसी केअर, रोड मित्र आणि पीएमसी आयएसडब्ल्यूएम यासह अन्य ॲप महत्वाची ठरत आहेत.

आॅनलाइन सेवा

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत एकूण ९७ सेवांपैकी ८९ सेवा आॅनलाइन उपलब्ध केल्या आहेत. गेल्या वर्षी २.२५ लाख नागरिकांनी याचा लाभ घेतला.

तक्रार निवारण प्रणाली

नागरिकांना मोबाईल ॲप्स, व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियासह १० माध्यमांमधून नागरिक तक्रार नोंदवितात. गेल्या वर्षभरात १.१५ लाख तक्रारींचे निवारण केले आहे.

ई-आॅफिसची अंमलबजावणी

महापालिकेत इ ऑफिसची अंलमबजावणी सक्तीची केली आहे. अडीच हजारापेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी इ ऑफिस वापरत आहेत. त्यामुळे कामकाजाची गती वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT