Pune Mayor Election 2026 Sarkarnama
पुणे

PMC Standing Committee 2026: पुणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आता पाच जणांच्या हातात जाणार, 'ही' नावे आघाडीवर

PMC Finance Control : पुणे महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आल्याने पक्षाची पूर्ण एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. अशा परिस्थितीत महापौरपदानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सभागृह नेते ही दोन्ही पदे अत्यंत महत्त्वाची ठरतात. यापैकी विशेषतः स्थायी समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे मानले जाते.

Sudesh Mitkar

Pune News, 04 Feb : महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेतेपदांची निवड झाल्यानंतर आता पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. या पदामुळे महापालिकेची तिजोरी थेट हातात येत असल्याने इच्छुक उमेदवारांची स्पर्धा तीव्र सुरू झाली आहे.

साधारणपणे 9 तारखेला स्थायी समिती अध्यक्षपदासाठीचे नाव निश्चित करण्यात येणार असून त्यानंतर 15 तारखेला होणाऱ्या जीबीमध्ये अध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब होईल. भाजपने मागील सभागृहाचे कामकाज सांभाळणारे गटनेते गणेश बिडकर यांनाच पुन्हा गटनेतेपदी नियुक्त केले आहे. त्यामुळे सभागृह नेतेपदाची जबाबदारीही ते पार पाडणार हे निश्चित झाले आहे.

परिणामी, गणेश बिडकर हे स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक अनिल टिंगरे, तसेच राजेंद्र शिळीमकर आणि सुरेंद्र पठारे यांच्यात तीव्र चुरस सुरू असल्याची चर्चा आहे.

धीरज घाटे हे सध्या भाजपचे शहराध्यक्ष असल्याने, पक्षाच्या 'एक व्यक्ती, एक पद' या धोरणानुसार त्यांना हे पद मिळेल की नाही, याबाबत पक्षांतर्गत वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहेत. जर घाटे यांना अध्यक्षपद दिले जाणार असेल, तर शहराध्यक्षपदासाठी बदल करावा लागेल, अशीही बोलणी सुरू आहेत.

पुणे महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आल्याने पक्षाची पूर्ण एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. अशा परिस्थितीत महापौरपदानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष आणि सभागृह नेते ही दोन्ही पदे अत्यंत महत्त्वाची ठरतात. यापैकी विशेषतः स्थायी समितीचे अध्यक्षपद महत्त्वाचे मानले जाते, कारण ही समिती महापालिकेच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा, तिजोरीचा आणि बजेटचा थेट कारभार सांभाळते.

यंदा 5 स्थायी समिती अध्यक्ष

यंदा स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पाच जणांना संधी मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण स्थायी समितीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. सामान्यतः दरवर्षी एका नव्या व्यक्तीला अध्यक्षपदाची संधी दिली जाते. मात्र, मागील पंचवार्षिक कालावधीत भाजपने फक्त चारच जणांना ही संधी दिली होती.

त्यामध्ये तत्कालीन अध्यक्ष आणि सध्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, योगेश मुळीक, सुनील कांबळे आणि हेमंत रासने यांचा समावेश होता. यंदा पक्षाचे 119 नगरसेवक झाल्याने तसेच पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने 5 वर्षात 5 स्थायी समिती अध्यक्ष नेमण्याचा फॉर्मुला निश्चित करण्यात आला असल्याचा देखील सांगण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT