Ajit Pawar Last Phone : अजित पवारांचा फोनवरील शेवटचा संवाद समोर, आम्ही सर्व जाती धर्मांना..., श्रीजीत पवारांसोबत काय बोलले?

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. त्यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद बारामतीकरांना आज ऐकता येणार आहे.
Ajit Pawar Last Phone
Ajit Pawar Last Phone sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. बारामतीकरांसह संपूर्ण राज्यात अजित पवारांचे निधनाने अनेकांना धक्का बसला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ते विमानाने बारामतीमध्ये येत असताना लँडींगच्या वेळी अपघात झाला त्यामध्ये त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला.

अजित पवार यांनी अपघातापूर्वी फोनद्वारे शेवटचा संवाद कोणसोबत साधला होता. ते नेमके काय म्हणाले होते याची उत्सुकता नागरिकांना होती. दरम्यान, आता अजित पवारांचा फोनवरील शेवटचा संवाद आज पुढे आला आहे. अजित पवार हे श्रीजीत पवार या कार्यकर्त्याच्या तक्रारीवर फोनवर बोलताना म्हणाले, 'आम्ही सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारे आहोत बाळा...'

श्रीजीत पवार यांनी एका समजाला उद्देशून निवडणुकीत उमेदवारी देण्यासंदर्भात अजित पवारांना मेसेज केला होता. हा मेसेज पाहिल्यानंतर अजित पवारांनी विमानातून श्रीजीत पवार यांना फोन केला. या फोनमध्ये अजित पवारांनी जो संवाद साधला तो बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात सर्वांना ऐकवला गेला . त्यांनी अखेरचा निरोप आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना कार्यकर्त्यांनी ऐकताच ते भावूक झाले.

Ajit Pawar Last Phone
TET EXAM : राज्य सरकारचा मोठा निर्णय! TET देणाऱ्या शिक्षकांना सूट, नेमकं कारण काय?

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांनी आपला पहिला दौरा सातारा जिल्ह्यात करत कराडमधील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच अजित पवारांच्या सोबत असलेल्या विदिप जाधव यांच्या कुटुंबांची भेट घेत त्यांचे सात्वंन केले.

Ajit Pawar Last Phone
Mumbai Airport : 'हृदयाचा ठोका चुकला...' मोठी दुर्घटना टळली, मुंबई विमानतळावर प्रवाशांनी भरलेल्या दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com