Vasant More, Uddhav Thackeray Sarkarnama
पुणे

Vasant More: आमदार, खासदारकीचे स्वप्न भंगलेल्या तात्यांनी बांधला आता नवीन चंग! कामालाही लागले ...

Vasant More Role in Pune Municipal Election 2025: ठाकरे सेनेकडून पुणे महापालिका निवडणुकी संदर्भातील महत्त्वाची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एक प्रकारे पुणे महापालिका निवडणुकीची धुरा वसंत मोरे यांच्या हातात दिली असल्याचं बोललं जात आहे.

Sudesh Mitkar

Pune News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी 2019 मध्ये मनसेमध्ये असताना हडपसर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली.मात्र त्यावेळी तात्यांचं आमदार होण्याचा स्वप्न अधुर राहील. त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वसंत मोरे यांनी खासदार होण्याचे स्वप्न पाहिलं.

मनसेमध्ये राहून आपलं खासदार होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही असं वाटल्यानंतर मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत निवडणूक लढली. मात्र पदरी निराशात पडली. त्यानंतर आता वसंत मोरे हे ठाकरे सेनेत असून पुणे महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता होण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल आता वाजले आहे. पुढील चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे सूचना केल्या आहेत. त्यामुळे पुढील चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असा विश्वास राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. वेगवेगळी रणनीती राजकीय पक्षांकडून ठरवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय घेण्याअगोदरच ठाकरे सेनेने पुणे महापालिका निवडणुकीसाठीची तयारी सुरू केली होती. पुणे महापालिका निवडणूक ठाकरे सेनेकडून लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पक्षाकडून घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोणकोणत्या प्रभागांमध्ये किती उमेदवार इच्छुक आहेत. याची प्राथमिक यादी पक्षाकडून तयार करण्यात आली आहे.

ठाकरे सेनेकडून पुणे महापालिका निवडणुकी संदर्भातील महत्त्वाची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. एक प्रकारे पुणे महापालिका निवडणुकीची धुरा वसंत मोरे यांच्या हातात दिली असल्याचं बोललं जात आहे. मोरे यांनी तयारी देखील सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये 50 हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून वसंत मोरे यांनी कामाला सुरुवात केली आहे.

पुणे महापालिकेमध्ये पन्नासहून अधिक नगरसेवक निवडून आणून आपण विरोधी पक्ष नेता होणार असल्याचं वसंत मोरे यांनी आत्ताच जाहीर करून टाकला आहे. यापूर्वी मनसेमध्ये असताना वसंत मोरे यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून काम पाहिला आहे.

त्यानंतर पुन्हा एकदा पुणे महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता होण्याचा चंग वसंत मोरे यांनी बांधला आहे. 2019 च्या निवडणुकांमध्ये आमदार होण्याचं आणि त्यानंतर 2024 च्या निवडणुकांमध्ये खासदार होण्याचे स्वप्न भंगलेल्या वसंत मोरेंचं आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थापित करून विरोधी पक्षनेता होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मोरेना कात्रज चौकातच अडकून ठेवण्याची शिंदे सेनेची रणनीती !

ठाकरे सेनेकडून मिशन पुणे लॉन्च करण्यात आले असून त्याची महत्त्वाची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे दिली आहे. अख्या पुण्याची जबाबदारी वसंत मोरे यांच्यावर दिली असताना त्यांना त्यांच्या प्रभागातच अडकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून शिंदे सेनानी रणनीती आखली असल्याचे सांगितले जात आहे. त्या दृष्टिकोनातून शिंदे सेनेकडून वसंत मोरे यांचे विरोधक असलेल्या कात्रज विकास आघाडीच्या नेत्यांचा पक्ष प्रवेश घडून आणण्यात आला आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना प्रभागात मोठं कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT