BJP's plan to defeat Ajit Pawar in Pune Sarkarnama
पुणे

PMC Election 2025: अजितदादांना खिंडीत गाठण्याचा भाजपाचा फुल प्रूफ प्लॅन ? पुणे महापालिकेसाठी कसं आखलं जातंय चक्रव्यूह!

How BJP is targeting Ajit Pawar in Pune: महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप रचना महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या नगरविकास विभागाला सादर केली. २०१७ ची प्रभागरचना प्रमाण मानून २०२५ची रचना याच पद्धतीने केल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Sudesh Mitkar

Ajit Pawar's political future in Pune:आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे. प्रभाग रचना करते जरी प्रशासन असलं तरी करविते हे भाजपचे नेते असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. एकीकडे भाजप प्रभागांची तोडफोड करून आपल्या सोयीप्रमाणे प्रभाग रचना बनवत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मात्र भाजप पुणे महापालिकेमध्ये महाविकास आघाडीचे नवे तर राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं आव्हान आपल्या समोर असल्याचे समजत आहे. सध्या पुणे महापालिकेमध्ये माजी नगरसेवकांच्या दृष्टिकोनातून बलाबल पाहिलं तर भाजप नंतर दुसऱ्या क्रमांकावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी येते. शिवसेना एकत्र असताना देखील पुण्यामध्ये सेनेची ताकद मर्यादितच राहिली आहे. आणि आता त्यांचे दोन गट झाल्यानंतर ती ताकद विभागली गेली आहे.

काँग्रेस आउटगोइंग आणि अंतर्गत गटबाजीमुळे संघर्ष करताना पाहायला मिळत आहे. तसेच शहरांमध्ये मनसेची ताकद देखील 2012 च्या निवडणुकीप्रमाणे राहिलेली नाही. विभागलेल्या राष्ट्रवादीत दादांकडे पुण्यातील सर्वाधिक नेते आणि कार्यकर्ते आहेत. त्यामुळे खरा प्रतिस्पर्धी हा दादांचा पक्ष असल्याचं भाजपला वाटत असल्याचं बोललं जात आहे.

सध्या पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजप युती करण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढल्यास भाजपला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्वात मोठे आव्हान वाटत आहे. त्यामुळे या प्रभाग रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे प्रभाग रचना करताना अजित पवारांची ताकद असलेल्या उपनगरांमध्ये मोठमोठे प्रभाग केल्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शहरातील वडगावशेरी, हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघांच्या शहरी भागात राष्ट्रवादीची चागली ताकद आहे.

त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुती झाली नाही, केव्हा झाली तरी या भागात राष्ट्रवादीचे कमी नगरसेवक कसे निवडून येतील, याची खबरदारी भाजपने घेतली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजित पवारांना खिंडीत गाठण्यासाठी फुल प्रुफ प्लान भाजपने पुण्यामध्ये तयार केला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनेसोबत आता राष्ट्रवादीचाही थेट मुंबईकडे मोर्चा

प्रभाग रचनेच काय वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही मित्र पक्षांची चर्चा झाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार एकत्रित काम करण्याचा निर्णय झाला मात्र नंतर भाजपच्या नेत्यांनी वरिष्ठांकडून आदेशात नसल्याचे सांगत शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रभाग रचनेच्या चर्चेतून दूरच ठेवलं असल्याचं सांगितलं जात आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रचंड नाराज आहेत. त्यामुळे आधी शिवसेनेने आणि त्यानंतर राष्ट्रवादीने देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली असल्याचं सांगितलं जात आहे.

त्यामुळे स्थानिक पातळीवर जरी विचारात घेतलेला नसला तरी आता नगर विकास खात्याकडे प्रभाग रचना गेल्याने त्या ठिकाणी वरिष्ठ पातळीवर काय होईल, याची चर्चा आहे. त्यामुळे तीनही पक्षांच्या स्थानिक नेत्यांचे लक्ष लागल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT