Pune Municipal Corporation sarkarnama
पुणे

PMC Election 2025: पुण्यात 2017 प्रमाणेच 4 सदस्यांचा प्रभाग कायम; उपनगरात 'मान्यवरांचा' कस लागणार

Pune Municipal Election 2025 Ward Structure Draft PMC 4 Member Panel:प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत स्थानिक स्वराज संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ आदींचा समावेश आहे.

Mangesh Mahale

✅ 3-पॉइंट सारांश (Summary):

  1. चार सदस्यीय प्रभाग ठेवण्याचा निर्णय: पुणे महापालिकेच्या 2025 निवडणुकीसाठी 2017 प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे.

  2. नवीन गावांचा समावेश: महापालिकेत 32 नव्या गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे उपनगरात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत.

  3. राजकीय समीकरणे बदलणार: भाजपला पुन्हा चार प्रभाग रचनेचा फायदा होण्याची शक्यता असून, इतर पक्षांना प्रभावी रणनीती आखावी लागणार आहे.

Pune News 2 August 2025:पुणे महापालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्यात आहे, सोमवारी त्याचा प्रारुप आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी बाबतचा आढावा घेतला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी 2017 प्रमाणेच 2025 मध्येही चार सदस्यांचा प्रभाग असेल. तर महापालिकेत 32 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांनाही प्रभाग रचनेत सहभागी करावे लागणार आहे. त्यामुळे उपनगरातील प्रभाग रचनेत मोठे फेरबदल होणार आहे.

२०११च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार प्रभाग रचना करण्यात आली आहे. यामुळे पुण्यात प्रभाग संख्या ४२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १६५ राहणार आहे. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे महापालिकेची मुदत संपली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना एक, दोन आणि तीनची होणार यावर अनेक दिवसापासून चर्चा सुरु होती. या निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीत स्थानिक स्वराज संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ आदींचा समावेश आहे. पुण्यात 2002 ते 2017 या काळात चार महापालिका निवडणुकांमध्ये एक वेळ तीनचा प्रभाग, दोन वेळा दोन सदस्यांचा प्रभाग तर एक वेळ चार सदस्यांचा प्रभाग होता.

पुणे महापालिका 2017 ला चार सदस्यीय प्रभाग रचना

प्रभाग - ४१

एकूण संख्या - १६२

भाजप - ९७ राष्ट्रवादी

काँग्रेस -४२

शिवसेना -१०

काँग्रेस - ९

मनसे - २

एमआयएम -१

अपक्ष - ४

  • २०१७ ला चारचा प्रभाग असताना भाजपचे सत्ता मिळवली होती.

  • राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसे यांच्यासाठी ही प्रभाग रचना डोकेदुखी ठरली आहे.

  • भाजप यावेळीही चारच्या प्रभाग रचनेचा फायदा उठवेलच

  • अन्य पक्षांनाही भाजपला रोखून धरण्यासाठी रणनीती आखावी लागणार आहे.

✅ 4 FAQs with One-Line Answers:

Q1. पुणे महापालिकेची प्रभाग रचना कोणत्या आधारावर करण्यात आली आहे?
2011 च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारे ही प्रभाग रचना करण्यात आली आहे.

Q2. नवीन प्रभाग रचनेत किती प्रभाग आणि नगरसेवक असतील?
पुण्यात 42 प्रभाग असतील आणि नगरसेवकांची संख्या 165 असेल.

Q3. कोणते पक्ष 2017 मध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेत अडचणीत आले होते?
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, आणि मनसे यांना ही रचना डोकेदुखी ठरली होती.

Q4. भाजपला प्रभाग रचनेचा कसा फायदा होतो?
2017 मध्ये भाजपने बहुमत मिळवले होते आणि 2025 मध्येही तोच फायदा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT