Pune Municipal Corporation sarkarnama
पुणे

PMC Election 2025: जुन्या नगरसेवकांना शोधावे लागणार नवे प्रभाग ; समाविष्ट गावातून १९ नगरसेवक पुणे महापालिकेत जाणार

Pune Municipal Election New Wards Impact News: प्रारूप प्रभाग रचनेत राजकीय कुरघोड्या झाल्या असल्या तरी समाविष्ट गावांच्या दृष्टीने ही प्रभाग रचना बऱ्यापैकी दिलासादायक झाली आहे. या गावातील लोकसंख्या बघता १६ ते १८ नगरसेवक या भागातून निवडून जाणे अपेक्षित होते.

ब्रिजमोहन पाटील

Summary

  1. पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी-फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे. ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत.

  2. समाविष्ट गावांमधून सुमारे १९ नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे, त्यामुळे जुन्या नगरसेवकांना नवे प्रभाग शोधावे लागणार आहेत.

  3. समाविष्ट गावांतील वीज, पाणी, रस्ते यांसारख्या मूलभूत समस्यांवर काम करू शकणारे उमेदवारच निवडून येतील.

Pune News: तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून रखडलेली पुणे महापालिकेची निवडणूक आता जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने पुणे शहरातील प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. यामध्ये ४१ प्रभागात १६५ नगरसेवकांचा समावेश आहे. प्रारूप प्रभाग रचनेत राजकीय कुरघोड्या झाल्या असल्या तरी समाविष्ट गावांच्या दृष्टीने ही प्रभाग रचना बऱ्यापैकी दिलासादायक झाली आहे.

प्रारूप प्रभाग रचनेत समाविष्ट गावांचा हद्दी जोडलेले तीन प्रभाग तयार झाले आहेत. तर उर्वरित तीन प्रभागात जुन्या आणि नव्या हद्दीचा समावेश आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या समाविष्ट गावातून १८ ते १९ नगरसेवक निवडून जाऊ शकतात. मात्र, या समाविष्ट गावांचे प्रभाग तयार करताना जुन्या हद्दीतील काही प्रभाग गायब झाल्याने माजी नगरसेवकांना आता योग्य प्रभागांची शोधाशोध करावी लागणार आहे.

२०१७ च्या निवडणुकीत पुणे महापालिकेत ४० प्रभागातून १६० नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर ११ गावे समाविष्ट झाल्याने दोन नगरसेवकांची संख्या वाढली. २०२१ ला आणखी २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट झाली. त्यातील फुरसुंगी व उरुळी देवाची या स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यात आल्याने ही गावे महापालिकेत वगळली गेली आहेत. त्यामुळे आता निवडणुकीसाठी ३२ गावांना महापालिकेच्या सभागृहात किती प्रमाणात प्रतिनिधित्व मिळणार याकडे लक्ष लागले होते.

समाविष्ट गावात वीज, पाणी, रस्ते या प्रमुख समस्या आहेत. या गावातून नगरसेवक निवडून गेले तर या भागातील विकासाला गती येऊ शकते.गावापुरता न मर्यादित राहता त्याचा वावर हा संपूर्ण प्रभागात असणे आवश्‍यक आहे. अशा तयारीचा कार्यकर्ता असेल तरी त्याची निवडून येण्याची शक्यता वाढेल. केवळ फ्लेक्सपुरते मर्यादित असलेले इच्छुक समाविष्ट गावांना न्याय देऊ शकणार नाहीत. समाविष्ट गावातून नगरसेवक होण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत.

या भागातून पहिल्यादांच नगरसेवक निवडणूक येणार

  • प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रूक-साडेसतरा नळी, -प्रभाग ३३ शिवणे- खडकवासला आणि प्रभाग ४१महंमदवाडी- उंड्री या तीन प्रभागांतून १२ नगरसेवक महापालिकेत निवडून जातील.

  • प्रभाग क्रमांक ३८ कात्रज आंबेगाव हा शहरातील एकमेव पाच सदस्यांचा प्रभाग आहे. यामध्ये समाविष्ट गावातील नऱ्हे, उर्वरित आंबेगाव, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी यासह सहा ते सात गावांचा समावेश आहे. या प्रभागातील पाच सदस्यांपैकी किमान दोन सदस्य समाविष्ट गावातून निवडून येऊ शकतात.

  • प्रभाग क्रमांक ३ विमाननगर-लोहगाव आणि प्रभाग क्रमांक ४ खराडी- वाघोली या दोन प्रभागात लोहगाव व वाघोली ही दोन गावे समाविष्ट आहेत. या दोन्ही प्रभागातून प्रत्येकी दोन नगरसेवकांचे प्रतिनिधित्व या दोन्ही गावातून होऊ शकते.

  • प्रभाग क्रमांक ९ सूस-बाणेर-पाषाण येथून सूस गावातून एक प्रतिनिधी दिला जाऊ शकतो. अशा प्रकारे सात प्रभागातून १९ नगरसेवक पुणे महापालिकेत निवडून येऊ शकतात.

FAQ

प्र.१: पुणे महापालिकेत यंदा किती नगरसेवक निवडून येणार आहेत?
उ: प्रारूप प्रभाग रचनेनुसार ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून येतील.

प्र.२: समाविष्ट गावांतून किती नगरसेवक महापालिकेत जाणार?
उ: अंदाजे १८ ते १९ नगरसेवक समाविष्ट गावांतून निवडून येऊ शकतात.

प्र.३: जुन्या नगरसेवकांना नवे प्रभाग का शोधावे लागतील?
उ: नव्या रचनेत काही जुने प्रभाग वगळले गेल्यामुळे त्यांना पर्यायी प्रभाग निवडावा लागणार आहे.

प्र.४: समाविष्ट गावांमधील प्रमुख समस्या कोणत्या आहेत?
उ: वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधा हे मुख्य प्रश्न आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT