Shiv Sena Pune leader Ravindra Dhangekar during municipal election campaigning, as setbacks loom with likely defeats of his wife and son in high-voltage ward contests. Sarkarnama
पुणे

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर यांना दुहेरी धक्का! बिडकर-आंदेकरांच्या ताकदीपुढे पत्नी अन् मुलगा पराभूत

PMC Election Result News : पुणे महापालिका निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना दुहेरी धक्का बसला आहे. पत्नी प्रतिभा पराभूत झाल्या असून मुलगा प्रणव देखील पराभूत झाला आहे.

Sudesh Mitkar

Pune PMC Result News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यातील शिवसेनेचे नेते आणि महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांना पुणे महापालिका निवडणुकीमध्ये दुहेरी धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 23 रविवार पेठ – नाना पेठमधून पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर यांनी पराभूत केले आहे. तर प्रभाग क्रमांक २४ – कसबा गणपती – कमला नेहरू – केईएम रुग्णालय इथून प्रणव धंगेकर यांचा भाजपच्या गणेश बिडकर यांच्याकडून दारूण पराभव झाला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीमध्ये विजय संपादन केल्यानंतर रवींद्र धंगेकर यांना गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीमध्ये पत्नी प्रतिभा धंगेकर आणि मुलगा प्रणव धंगेकर यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवलं होतं. या दोन्ही निवडणुकीसाठी रवींद्र धंगेकर यांनी मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती.

त्यांची पत्नी प्रभाग क्रमांक 23 मधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सोनाली अधिकारी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात होत्या. सोनाली आंदेकर यांना उमेदवारी देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर मोठी प्रमाणात टीका झाली होती. खांडेकर या हत्या झालेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी आहेत. आयुष कोमकर यांच्या हत्या प्रकरणांमध्ये सध्या त्या जेलमध्ये आहेत. मात्र त्यांनी जेलमधूनच या निवडणुकीमध्ये विजय संपादन केला असल्याचा पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 24 मधून पुण्यातील सर्वाधिक हायव्होल्टेज लढत गणेश बिडकर विरुद्ध धंगेकर होत आहे. या लढतीमध्ये देखील बिडकर यांचा पारडं जड असून प्रणव धंगेकर यांचा पराभव झाला आहे. गणेश बिडकर यांच्याकडे आता पुण्याचे महापौर म्हणून बघितले जात आहे. त्यामुळे धंगेकर यांचे तेलही गेलं आणि तूपही केली अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT