Shiv Sena UBT leader Vasant More addressing media in Pune after municipal election defeat, alleging BJP and Congress collaboration to engineer his loss. Sarkarnama
पुणे

Vasant More : वसंत मोरेंना पाडण्यासाठी भाजप-काँग्रेसची हातमिळवणी! नेमका कसा कट शिजला? 'या' नेत्यावर गंभीर आरोप

Pune Municipal Politics : पुणे महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना उबाठा नेते वसंत मोरे यांनी भाजप-काँग्रेस संगनमताचा आरोप करत प्रशांत जगताप यांच्यावर कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Sudesh Mitkar

Pune Politics News : नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये पुणे शहरात अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिला तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांचा पराभव. वसंत मोरे यांना यंदाच्या निवडणुकीत अकराशे मतांनी भाजप उमेदवाराकडून पराभूत व्हावे लागले. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी नुकतेच काँग्रेसवासी झालेल्या प्रशांत जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 38 मधून वसंत मोरे हे मशाल चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणामध्ये उतरले होते. त्यांच्यासोबतच त्यांचा मुलगाही यंदा पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत होता. मात्र, या पिता-पुत्रांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. वसंत मोरे यांच्या विरोधात भाजपने एक नवखा उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरवला होता. भाजपा उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी वसंत मोरे यांचा अकराशे मतांनी पराभव केला.

निकालानंतर लगेचच वसंत मोरे यांनी मतदान झाल्यानंतर देण्यात आलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात मतमोजणी वेळी देण्यात आलेल्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचा आरोप केला होता. 1100 मतांनी माझा पराभव झाला तेवढीच मतं मतमोजणीमध्ये कशी काय कमी आली, असा देखील सवाल वसंत मोरे यांनी केला होता. तसंच यापुढे ईव्हीएम विरोधात आपण मैदानात उतरणार असल्याचे देखील मोरे यांनी स्पष्ट केला आहे.

सर्व घडामोडी घडत असताना आज वसंत मोरे यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रशांत जगताप यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रशांत जगताप यांनी भाजपशी हातमिळवणी करून माझा पराभव घडून आणला असल्याचा देखील वसंत मोरे यांनी सांगितलं आहे.

वसंत मोरे म्हणाले, माझ्या भागामध्ये काँग्रेसचे उमेदवार देण्यावरून काँग्रेस शहराध्यक्ष आणि मी सातत्याने प्रशांत जगताप यांना सांगत होतो भांडत होतो की आपली आघाडी आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात तुम्हाला एक जागा सोडलेली असताना इतर उमेदवार देऊ नका तरी देखील प्रशांत जगताप यांनी माझ्या भागामध्ये काँग्रेसचे पाच उमेदवार दिले.

हे सगळं प्री प्लांट होतं यामध्ये काँग्रेस देखील सहभागी होतं पाडण्यासाठी प्रशांत जगताप यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली असा माझा आरोप आहे. तो मी सिद्ध करून दाखवेल असं वसंत मोरे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT